ETV Bharat / state

Ranjit Savarkar : महात्मा गांधी यांना ब्रिटिशांचे नोकर बनायचे होते?, रणजीत सावरकरांचा राहुल गांधी यांना सवाल - सावरकरांचे नातू रणजीत सावरकर

ब्रिटिशांना लिहलेल्या पत्रात "इट इज ओनर टू रीमेन युवर हम्बल" असे देखील गांधीजींनी लिहिलं होतं. मग याचा अर्थ गांधीजींना ब्रिटिशांचा नोकर बनायचं होते ?असा अर्थ मी काढणार नाही, असा टोला लावला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विधान केले होते. त्यावर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींना पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर (Ranjit Savarkar on Rahul Gandhi ) दिले.

Ranjit Savarkar
रणजीत सावरकर
author img

By

Published : Nov 18, 2022, 9:23 PM IST

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांच्याकडून निषेध करण्यात आला. वीर सावरकर यांनी ब्रिटिशांना माफीनामा दिला होता, असे पत्र राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून दाखवले. यावर आज रणजीत सावरकर यांनी ती पत्र लिहिण्याची पद्धत आहे. महात्मा गांधी यांनी देखील ब्रिटिशांना अशा प्रकारची पत्र लिहिली होती. अशी उदाहरण रणजीत सावरकर यांच्याकडून ( Ranjit Savarkar on Rahul Gandhi ) देण्यात आली.

गांधींना नोकर बनायचे होते का ? ब्रिटिशांना लिहलेल्या पत्रात "इट इज ओनर टू रीमेन युवर हम्बल" असे देखील गांधीजींनी लिहिलं होतं. मग याचा अर्थ गांधीजींना ब्रिटिशांचा नोकर बनायचं होते ?असा अर्थ मी काढणार नाही, असा टोला लावला आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या पत्राचे गुगल ट्रान्सलेट केले असल्याचा चिमटा देखील पत्रकार परिषदेतून काढला आहे. जलियान वाला बाग हत्याकांडात हुतात्म्य पत्करणाऱ्याना गांधीजी हुतात्मे बोलणार नाही असे म्हणाले होते. हा गांधीजींनी देशभक्तांच्या अपमान केला.

तर भगतसिंह यांचे प्राण वाचले असते - गांधीजींनी योग्य वेळी करार झाला असता तर भगत सिंह यांचे देखील प्राण वाचले असते. मग याला देशद्रोह म्हणायचे नाही का? असेही रणजीत सावंत पत्रकार परिषदेतून म्हणाले आहेत. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्यात गांधीच्या विरोधात परिषदा झाल्या होत्या. मग आता राहुल गांधी बाबासाहेब यांचाही विरोध करतील का? असा सवाल देखील सावरकर यांनी उपस्थित केला. आज वीर सावरकर स्मारक येथे रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला.

सावरकारांनी कायद्यानुसार अर्ज केला - वीर सावरकर यांनी कायद्याने हक्क मागितला. हक्क मागणे वाईट नाहीये. सावरकर यांची जी मागणी होती त्यात त्यांनी बाहेर सोडण्यासाठी कायद्याने मागणी केली होती. सामान्य बंदी असतील तर त्यांना 6 महिन्यात बाहेर सोडले जायचे. मात्र त्यांना सोडण्यात आल नव्हते म्हणून त्यांनी कायद्यानुसार अर्ज केला होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात आपण तक्रार दाखल केली असून पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध देखील नोंदविण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी रणजीत सावंत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.