ETV Bharat / state

Rameshwar Mishra Arrested : पंतप्रधान मोदी यांची व्हीव्हीआयपी सुरक्षा भेदणाऱ्या रामेश्वर मिश्राला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - रामेश्वर मिश्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हीव्हीआयपी सुरक्षा रामेश्वर मिश्रा या इसमाने भेदली होती. त्या रामेश्वर मिश्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने हे कृत्य नेमके कशासाठी केले? याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झाले नाही. कर्नाटकमध्ये असाच काहीसा प्रकार पंतप्रधानांच्या भेटीवेळी घडला होता.

rameshwar mishra Arrested
नरेंद्र मोदी यांची व्हीव्हीआयपी सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Jan 21, 2023, 12:49 PM IST

Updated : Jan 21, 2023, 8:08 PM IST

पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम माहिती देताना

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील सभेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी कक्षेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामेश्वर मिश्रा या तरुणाला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी अटक केली. रामेश्वर हा एनएसजी कमांडो असल्याचे बोगस ओळखपत्र दाखवून आतमध्ये शिरत असताना त्याला पकडण्यात आले. नवी मुंबईचा राहणारा रामेश्वर हा एनएसजीमध्ये २०१९ पर्यंत कार्यरत असल्याचे सांगत आहे. रामेश्वरने सायन्स शाखेतून पदवी घेतलेली आहे. न्यायालयाने त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

खोटे ओळखपत्र वापरले : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सयेथील एमएमआरडी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी सभा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. गुन्हे शाखा युनिट २ चे जयेश कुलकर्णी, सहायक आयुक्त चंद्रकांत जाधव, पोलिस निरीक्षक बाळासाहेब राऊत, उप निरीक्षक पांडुरंग शिंदे, अविनाश वळवी यांच्यावर व्हीव्हीआयपी कक्षा सांभाळण्याची जबाबदारी होती. खासदार, मंत्री, आमदार यांचे चेकींग करून सोडले जात होते. दुपारी तीनच्या सुमारास रामेश्वर मिश्रा व्हीव्हीआयपी कक्षेजवळ आला. त्याच्या गळ्यामध्ये पीएमओ कार्यालयाकडून दिली जाणारी सुरक्षा रिबीन असल्याने पोलिसांनी मिश्राला ओळखपत्र दाखविण्यास सांगण्यात आले. मिश्राने ओळखपत्र न दाखवता 'द गार्ड' या लष्कराच्या पठाणकोट येथील बटालियनचा नायक असल्याचे त्याने सांगितले.

एनएसजीमध्ये काम केले : पोलिसांनी रामेश्वर मिश्रा याला ताब्यात घेऊन त्याला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात नेले. बेकायदेशीर प्रवेश आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. एनएसजीमध्ये काम केल्याचे मिश्रा सांगत आहे. २०१९ पर्यंतचे त्याच्याकडे ओळखपत्र आहे. त्यामध्ये खाडाखोड करून त्याने मुदत २०२५ पर्यंत वाढवली होती. असे करण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, याबाबत तो स्पष्ट काहीच सांगत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

कर्नाटकमध्ये घडला होता असा प्रकार : कर्नाटकमध्येही कडक सुरक्षा व्यवस्था भेदून एक मुलगा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ पोहोचल्याने खळबळ उडाली होती. कर्नाटकमधील हुबळी येथे गुरुवारी आयोजिण्यात आलेल्या रोड शोदरम्यान ही घटना घडली होती. दुसरीकडे मुंबईत घडलेल्या घटनेतील मिश्रा हा २०१६ ते २०१९ पर्यंत एनएसजी सेवेत होता. तसेच त्याच्याकडे दिल्ली पोलीस पीएम सुरक्षा असलेली रिबीन आढळून आली. त्याबाबत पोलिसांनी मिश्राला विचारणा केली. तेव्हा त्याने माहिती देण्यास नकार दिला. मिश्राने ओळखपत्रात खाडाखोड केली असून ते ओळखपत्र बनावट असल्याचा पोलिसांना संशय आला होता.

हेही वाचा : Ajit Pawar On Cibil Issue : शासन निर्णयाला केराची टोपली ; पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ सक्ती, वचक नसल्याने बेसूमार लूट - अजित पवार

Last Updated : Jan 21, 2023, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.