ETV Bharat / state

पूनम महाजनांनी रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या श्रीरामाच्या पालखीला दिला खांदा - पूनम महाजन

कुर्ला जिल्हा बजरंग दल आणि सर्वोदय मंडळ बैलबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने बैलबाजार परिसरात रामनवमीनिमित्त पालखी काढण्यात आली. या पालखीला भाजपचे मुंबई उत्तर मध्यचे उमेदवार पूनम महाजन यांनी खांदा दिला.

रामनवमीनिमित्त निघालेल्या पालखीला पूनम महाजनांनी दिला खांदा
author img

By

Published : Apr 14, 2019, 10:15 PM IST

मुंबई - कुर्ला जिल्हा बजरंग दल आणि सर्वोदय मंडळ बैलबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने बैलबाजार परिसरात रामनवमीनिमित्त पालखी काढण्यात आली. या पालखीला भाजपचे मुंबई उत्तर मध्यचे उमेदवार पूनम महाजन यांनी खांदा दिला. जय श्री रामाच्या घोषणेत सर्वोदय मित्र मंडळापासून या पालखीला सुरुवात झाली.

कुर्ला बैल बाजार परिसरात मागील १५ वर्षांपासून राम नावमीनिमित्ताने रामाच्या पालखीचे आयोजन केले जाते. मात्र, ही पालखी राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. आज (रविवारी) या पालखीची सुरुवात पूनम महाजन यांनी खांदा दिल्यानंतर झाली. यंदा या पालखीत सामाजिक संदेश देण्यासाठी पालखीसमोर प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेसोबतच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, आदी महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.

रामनवमीनिमित्त निघालेल्या पालखीला पूनम महाजनांनी दिला खांदा

मागील काही वर्षांपासून बलात्कार आणि इतर काही प्रकरणामुळे कारागृहात असलेल्या आसाराम बापू यांचा एक मोठा वर्ग, त्यांचे भजनीमंडळ, आणि आसाराम बापू यांच्या भव्य प्रतिमा आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करणारी वाहनेही या पालखीसोबत होती. पुलावामामध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि राम मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी बांधण्यासाठी संदेश देत असल्याचे, या पालखीचे आयोजक व बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख संजीव झा यांनी यावेळी सांगितले.

Intro:पूनम महाजन यांनी दिला रामाच्या पालखीला खांदा

Body:कुर्ल्यातील बैल बाजारात पूनम महाजन यांनी दिला रामाच्या पालखीला खांदा;

मुंबई, ता. 14 :

कुर्ला जिल्हा बजरंग दल आणि सर्वोदय मंडळ बैलबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने बैलबाजार परिसरात काढण्यात आलेल्या रामाच्या पालखीला खासदार व उत्तर मध्य मुंबईच्या भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन त्याने खांदा दिला. जय श्री रामाच्या घोषणेत सर्वोदय मित्र मंडळापासून या पालखीला सुरुवात झाली आणि त्या निमित्ताने महाजन यांनी पालखीला खांदा देत पुढील कार्यक्रमाला निघाल्या.
कुर्ला बैल बाजार परिसरात मागील 15 वर्षांपासून राम नावमीनिमित्ताने रामाच्या पालखीचे आयोजन केले जाते.मात्र ही पालखी राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. आज या पाळखीची सुरुवात ही पूनम महाजन यांनी खांदा दिल्यानंतर झाली.काही वेळ चालल्यानंतर महाजन या पुढे निघाल्या. यंदा या पालखीत सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी पालखीच्या समोर प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेसोबतच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, आदी महापुरुषांच्या प्रतिमा या अनेक वाहनांवर लावण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे धनगरी नृत्य सादर करण्यासाठी अश्वावर स्वार झालेल्या खंडोबाची प्रतिकृती आणि पुढे वाजंत्री ठेवण्यात आले होते.
मागील काही वर्षांपासून बलात्कार आणि इतर काही प्रकरणामुळे कारागृहात असलेल्या आसाराम बापू यांचा एक मोठा वर्ग, त्यांचे भजनीमंडळ, त्यावर आसाराम बापू यांच्या भव्य प्रतिमा आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करणारी वाहने या पालखीत अनेकांचे आकर्षण ठरणल्या होत्या. आम्ही यंदा पुलावामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि राम मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी बांधण्यासाठी संदेश देत असल्याचे या पालखीचे आयोजक व बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख संजीव झा यांनी यावेळी सांगितले.

Conclusion:पूनम महाजन यांनी दिला रामाच्या पालखीला खांदा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.