मुंबई - मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा केला होता. या दाव्याची पोलखोल भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे दिसत आहे.
आज घाटकोपर सज्जनगड परिसरात पाऊस पडला. या पावसाच्या पाण्याने नाले भरून रस्त्यावर वाहत होते. यात काही नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या, तसेच काहींच्या घरात पाणी घुसले. या परिस्थितीचा व्हीडिओ राम कदम यांनी पोस्ट केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, राम कदम यांनी हा व्हीडिओ शेअर करताना मुंबई महापालिका, संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॅग केले आहे.
महापालिकेचा नालेसफाईचा दावा खोटा आहे. आता संजय राऊत म्हणतील की, आम्ही राजकारण करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पाहा हा व्हीडिओ, असे सांगत भाजपा आमदार राम कदम यांनी नालेसफाईची पोलखोल केली आहे.
-
नाला सफ़ाई का @mybmc झूठा दावा ...एक ही दिन में फेल .. @rautsanjay61 अब यह मत कहना हम आरोप कर रहे है @CMOMaharashtra खुद अपनी आँखो से देखो @OfficeofUT pic.twitter.com/2dpYqMPZRg
— Ram Kadam (@ramkadam) June 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">नाला सफ़ाई का @mybmc झूठा दावा ...एक ही दिन में फेल .. @rautsanjay61 अब यह मत कहना हम आरोप कर रहे है @CMOMaharashtra खुद अपनी आँखो से देखो @OfficeofUT pic.twitter.com/2dpYqMPZRg
— Ram Kadam (@ramkadam) June 3, 2020नाला सफ़ाई का @mybmc झूठा दावा ...एक ही दिन में फेल .. @rautsanjay61 अब यह मत कहना हम आरोप कर रहे है @CMOMaharashtra खुद अपनी आँखो से देखो @OfficeofUT pic.twitter.com/2dpYqMPZRg
— Ram Kadam (@ramkadam) June 3, 2020
मुंबई महापालिकेने नाल्याची सफाई केली असून पावसाळ्यात काही प्रश्न उद्भवणार नाहीत, असा दावा केला होता. पण या दाव्याच्या काही तासातच पाऊस झाला. यात सज्जनगड परिसरात नालेभरून वाहू लागले. हे पाणी अनेकाच्या घरातही घुसले. याचा व्हीडिओ राम कदम यांनी शेअर करत मुंबई महापालिकेच्या दाव्याची पोलखोल केली आहे.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ : मुंबईच्या ससून डॉक परिसराचा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आढावा
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईहून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल