ETV Bharat / state

Mamata Rakhi To Amitabh Bachchan : रक्षाबंधनासाठी ममता बॅनर्जी अमिताभ बच्चन यांच्या घरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 7:03 PM IST

Updated : Aug 30, 2023, 11:02 PM IST

इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबई आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राखी बांधण्यासाठी (Rakshabandhan 2023) अमिताभ बच्चन यांच्या घरी पोहोचल्या आहेत. त्यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताब बच्चन यांना राखी बांधली आहे. तसंच त्यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील राखी बांधली आहे. (Mamata Rakhi To Uddhav Thackeray)

Mamata Banerjee tied rakhi to Amitabh Bachchan
ममता बॅनर्जींंनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली

मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबई आलेल्या ममता बॅनर्जी राखी बांधण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या घरी पोहोचल्या आहेत. त्यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताब बच्चन यांना राखी बांधली आहे. त्यानंतर त्या म्हणाल्या की, "मी आज खूप आनंदी आहे. मी आज बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसंच त्यांना रक्षाबंधनानिमित्त राखी देखील बांधली. मला बच्चन कुटुंब प्रचंड आवडतं. हे कुटुंब भारतातील प्रथम क्रमांकाचं कुटुंब आहे. मी अमिताभ बच्चन यांना दुर्गापूजा, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Rakshabandhan 2023) (Mamata Banerjee tied rakhi to Amitabh Bachchan)

महानायकाला बांधली राखी : देशभरात रक्षाबंधन सण साजरा होत आहे. राखी हे भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. या प्रसंगी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. तसंच त्यांच्याकडून सदैव रक्षण करण्याचं वचन घेतात. देशभरातील सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. (Mamata Rakhi To Amitabh Bachchan) अशात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राखी बांधण्यासाठी महानायक अमिताब बच्चन यांच्या घरी पोहचल्या आहेत. तिथं त्यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला आहे. तसंच त्यांनी मातोश्री निवासस्थानी भेट देत रक्षाबंधननिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधलीय.

Mumbai | West Bengal CM Mamata Banerjee tied rakhi to Former Maharashtra CM Uddhav Thackeray at his residence

(Pic source - TMC) pic.twitter.com/icau5SS0VS

— ANI (@ANI) August 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हिडिओ व्हायरल : ममता बॅनर्जी त्यांच्या ताफ्यासह अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, वाहनांचा ताफा 'जलसा' बंगल्याच्या आत पोहोचला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी समोरच्या सीटवर बसलेल्या दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या घरी अनेकवेळा येण्याचं आमंत्रण दिलं होतं. ममता बॅनर्जी यावेळी मुंबईत इंडियाच्या बैठकीनिमित्त असल्यामुळं त्यांनी बच्चन कुंटुंबाचं निमंत्रण स्वीकारत त्यांच्या घरी भेट दिली.

Mamata Banerjee visited the Bachchan family Mamata Banerjee visited the Bachchan family
ममता बॅनर्जी यांनी बच्चन कुटुंबाची भेट घेतली

हेही वाचा -

  1. INDIA meeting PC : देशात लोकशाही टिकवण्यासाठी इंडिया आघाडीची घोडदौड - उद्धव ठाकरे
  2. Sanjay Raut On Eknath Shinde : अत्यंत लाचार मुख्यमंत्री सत्तेवर बसवला; नीती आयोगाच्या बैठकीतील ठरावावरुन संजय राऊत यांचा संताप
  3. Ravi Rana On Navneet Rana : खासदार नवनीत राणा अपक्ष निवडणूक लढवणार, मोदी-शाह यांचा पाठिंबा

  • Mumbai | West Bengal CM Mamata Banerjee tied rakhi to Former Maharashtra CM Uddhav Thackeray at his residence

    (Pic source - TMC) pic.twitter.com/icau5SS0VS

    — ANI (@ANI) August 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हिडिओ व्हायरल : ममता बॅनर्जी त्यांच्या ताफ्यासह अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, वाहनांचा ताफा 'जलसा' बंगल्याच्या आत पोहोचला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी समोरच्या सीटवर बसलेल्या दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या घरी अनेकवेळा येण्याचं आमंत्रण दिलं होतं. ममता बॅनर्जी यावेळी मुंबईत इंडियाच्या बैठकीनिमित्त असल्यामुळं त्यांनी बच्चन कुंटुंबाचं निमंत्रण स्वीकारत त्यांच्या घरी भेट दिली.

Mamata Banerjee visited the Bachchan family Mamata Banerjee visited the Bachchan family
ममता बॅनर्जी यांनी बच्चन कुटुंबाची भेट घेतली

हेही वाचा -

  1. INDIA meeting PC : देशात लोकशाही टिकवण्यासाठी इंडिया आघाडीची घोडदौड - उद्धव ठाकरे
  2. Sanjay Raut On Eknath Shinde : अत्यंत लाचार मुख्यमंत्री सत्तेवर बसवला; नीती आयोगाच्या बैठकीतील ठरावावरुन संजय राऊत यांचा संताप
  3. Ravi Rana On Navneet Rana : खासदार नवनीत राणा अपक्ष निवडणूक लढवणार, मोदी-शाह यांचा पाठिंबा
Last Updated : Aug 30, 2023, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.