ETV Bharat / state

पीएमसी बँक घोटाळा : वाधवा पिता-पुत्रांना नजरकैदेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश - Mumbai latest news

या बरोबरच एचडीआयएल कंपनीची संपत्ती विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून पीएमसी बँकेचे बुडीत कर्ज वसूल करावे, असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

PMC bank scam
पीएमसी बँक घोटाळा
author img

By

Published : Jan 15, 2020, 9:01 PM IST

Updated : Jan 15, 2020, 9:46 PM IST

मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोन्ही आरोपींना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतील बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे.

वाधवा पिता-पुत्रांना नजरकैदेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

हेही वाचा - नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत

या बरोबरच एचडीआयएल कंपनीची संपत्ती विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून पीएमसी बँकेचे बुडीत कर्ज वसूल करावे, असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती नेमण्यात येणार आहे. या समितीला त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करायचा आहे.

हेही वाचा - योगेश सोमण यांच्यावरील कारवाई ही शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी - सचिन सावंत

सारंग वाधवा व राकेश वाधवा यांना त्यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. कंपनीच्या संपत्ती विषयीचा व्यवहार हा सुरळीत चालावा व त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये, म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे, यासाठी लागणारा खर्च वाधवा पिता-पुत्रांनी करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पीएमसी बँक प्रकरणी अगोदरच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून व ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत 19 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजीत मोरे व न्यायाधीश सुरेंद्र तायडे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही सुनावणी झाली.

Intro:पाच हजार कोटींहून अधिक मोठा घोटाळा असलेल्या पीएमसी बँकेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देत पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोन्ही आरोपींना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे या बरोबरच एचडीआयएल कंपनीची संपत्ती विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून हा पीएमसी बँकेचे बुडीत कर्ज वसूल करावे असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात येणार आहे . या समितीला त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करायचा आहे

Body:सारंग वाधवा व राकेश वाधवा यांना त्यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे . कंपनीच्या संपत्ती विषयीचा व्यवहार हा सुरळीत चालावा व त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे , यासाठी लागणारा खर्च व सारंग पिता-पुत्रांना नजर कैदेत त ठेवण्यासाठी येणारा पोलीस सुरक्षेचा खर्च हा सारंग पिता-पुत्रांनी करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पीएमसी बँक प्रकरणी अगोदरच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून व ईडी कडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत 19 हुन अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

Conclusion:मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजीत मोरे व न्यायाधीश सुरेंद्र तायडे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने हे आदेश दिल्यानंतर पीएमसी बँक खातेदारांना दिलासा मिळणार आहे असे सांगितले जातय.

( रेडी टू अपलोड पॅकेज जोडले आहे.)
Last Updated : Jan 15, 2020, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.