मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha elections ) अनुषंगाने सहाव्या जागेच्या बाबतीत चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणून सहावी जागा एकत्रितपणे लढण्याचा विचार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते बोलत होते. संभाजी महाराजांचा (Sambhaji Maharaj) आम्ही आदर करतो मात्र आमच्या सोबत त्यांचे कोणतेही बोलणे झालेलं नाही त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही आमच्याकडेही जास्तीची मते आहेत मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ती शिवसेनेच्या उमेदवाराला देण्याचा विचार करीत आहोत असेही पटोले म्हणाले.
राज ठाकरे हे देशातील महत्त्वाचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी दौरे आयोजित करत असतात देशात महागाई दररोज वाढते आहे हा जनतेचा मुख्य प्रश्न आहे मात्र त्याच्याकडून लक्ष वळवण्यासाठीच दौरे आयोजित करायचे आणि नंतर ते रद्द करायचे ही त्यांची पद्धत आहे अशी टीका नाना पटोले यांनी राज ठाकरे यांच्यावर केली तसेच आम्हाला कोणाकडून धर्माच्या गोष्टी शिकायची गरज नाही असेही पटोले म्हणाले.
राज्यात महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला आहे जीएसटीच्या माध्यमातून केंद्राने सर्व नियंत्रण आपल्या हातात घेतले असून कोणतेही कर वाढवण्यात आलेले नाहीत असेही पटोले यांनी स्पष्ट केले मात्र आमचे लाखो कोटी रुपये केंद्राकडे प्रलंबित आहेत आमच्या हक्काचा पैसा लवकरात लवकर केंद्राने द्यावा आणि आम्हाला आर्थिक अडचणीत आणू नये त्यांना महाराष्ट्र आणि मुंबईला बरबाद करायचे आहे असा आरोपही पटोले यांनी केला.