मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचींना, भेटीगाठींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख खासदार नारायण राणेंची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार शेट्टी आणि नारायण राणे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यामध्ये येमाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. तसेच ईव्हीएम संदर्भातही चर्चा झाली आहे. त्यामुळे या भेटीचा परिणाम नेमका काय होतो ते पाहणे गरजेचे ठरणार आहे.
याधीही राजू शेट्टींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली होती. या भेटीमध्येही विधानसबा निवडणुकीविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. आता शेट्टींनी राणेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढले जात आहे. युती किंवा आघाडीत न जाता स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे आणि स्वाभिमान पक्ष आगामी निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात.