ETV Bharat / state

आज शिवाजी महाराज असते तर सर्व राज्यकर्त्यांना.... राजू शेट्टींचा निशाणा - राजू शेट्टींचा भाजपवर निशाणा

रयतेला संरक्षण देणारे शिवाजी महाराज कुठे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे नरेंद्र मोदी कुठे?  छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अशक्य आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांची लूट पाहून आज शिवाजी महाराज असते, तर त्यांनी निश्चित राज्यकर्त्यांना टकमक टोकावरुन ढकलून दिले असते अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

Raju shetti comment on bjp
आज शिवाजी महाराज असते तर सर्व राज्यकर्त्यांना....
author img

By

Published : Jan 17, 2020, 10:02 AM IST

मुंबई - रयतेला संरक्षण देणारे शिवाजी महाराज कुठे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे नरेंद्र मोदी कुठे? छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अशक्य आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांची लूट पाहून आज शिवाजी महाराज असते, तर त्यांनी निश्चित राज्यकर्त्यांना टकमक टोकावरुन ढकलून दिले असते अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

कार्पोरेट विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवे तेवढे लुटण्याची परवानगी देणारे पंतप्रधान मोदी कुठे? आणि शेतकऱ्याच्या बांधावरुन जात असताना गवताच्या काडीला जरी धक्का लागला तर हात कलम केले जातील असे सांगणारे शिवाजी महाराज कुठे? त्यामुळे मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना अशक्य असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

आज शिवाजी महाराज असते तर सर्व राज्यकर्त्यांना....

छत्रपती शिवाजी महाराजांवरुन सुरु असलेला वाद म्हणजे षडयंत्राचा भाग असल्याचे शेट्टी म्हणाले. वादग्रस्त पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना नरेंद्र मोदींशी करण्याची हिम्मत लेखक जय भगवान गोपाल यांची कशी झाली? असा प्रश्न शेट्टींनी केला. रयतेला संरक्षण देणारे शिवाजी महाराज कुठे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे नरेंद्र मोदी कुठे? असे म्हणत शेट्टींनी भाजपवर टीका केली. विमा कपंन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी संपूर्णपणे शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्यांना कंगाल करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे शेट्टी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेचे राज्य होते. सैन्य शेताच्या बांधावरुन जात असताना शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अन्यथा हात कलम केले जातील असा इशारा शिवाजी महाराज देत होते. आजच्या घडीला शेतकऱ्यांची दुरावस्था पाहता शिवाजी महाराज असते तर त्यांनी राज्यकर्त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिले असते अशी खोटक टीका शेट्टींनी केली.

Intro:Body:mh_mum_raju_shetty_shiavajiissue_mumbai_7204684

आज शिवाजी महाराज असते तर सर्व राज्यकर्त्यांना टकमक टोकावरून ढकलुन दिले असते : राजू शेट्टी

मुंबई: कार्पोरेट विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवे तेवढे लुटण्याची परवानगी देणारे पंतप्रधान मोदी कुठे आणि शेतकऱ्याच्या बांधावरुन जात असताना गवताच्या काडीला जरी धक्का लागला तर हात कलम केले जातील असे सांगणारे शिवाजी महाराज कुठे? छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अशक्य कोटीची आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांची लूट पाहून आज शिवाजी महाराज असते, तर त्यांनी निश्चित राज्यकर्त्यांना टकमक टोकावरुन ढकलून दिले असते अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यावरून सुरू असलेला सध्याचा वाद षड्यंत्राचा भाग असल्याचे सांगत राजू शेट्टी म्हणाले,
वादग्रस्त पुस्तकांमध्ये लेखक यांची नरेंद्र मोदींची तुलना करण्याची हिम्मत कशी झाली?
रयतेला संरक्षण देणारे शिवाजी महाराज कुठे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे नरेंद्र मोदी कुठे? राजू शेट्टी यांची भाजपावर टीका केली. शेतकरी भिमाच्या नावावर शेतकरी सरकार पुरस्कृत कार्पोरेट कंपनीच्या माध्यमातून लुटला जात आहे त्यांचा हिस्सा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी एकाबाजूला इशारा देतात. दुसऱ्या बाजूला संपूर्णपणे शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकरी कंगाल करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रयतेचे राज्य होते सैन्य शेताच्या बांधावरुन जात असताना शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अन्यथा हात कलम केले जातील असा इशारा शिवाजी महाराज येत होते. आजच्या घडीला शेतकऱ्यांची दुरावस्था निश्चितपणे राज्यकर्त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिले असते असे राजू शेट्टी म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.