ETV Bharat / state

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध स्तरातून अभिवादन

author img

By

Published : Jan 12, 2020, 12:11 PM IST

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त विविध स्तरातून अभिवादन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरून राजकीय नेत्यांसह अनेकांनी जिजाऊंना अभिवादन केले आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ
राष्ट्रमाता जिजाऊ

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला होता. त्यांच्या जयंती निमित्त विविध स्तरातून अभिवादन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरून राजकीय नेत्यांसह अनेकांनी जिजाऊंना अभिवादन केले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राष्ट्रमाता जिजाऊंचा 422 वा जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त आज सकाळी जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव, वंशज लखोजीराजे जाधव, मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह मान्यवरांनी जिजाऊंना अभिवादन केले. या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच जिजाऊंच्या जन्मस्थळावर शिवप्रेमीची व जिजाऊप्रेमींची रीघ लागली आहे.

हेही वाचा - 'तान्हाजी' सिनेमा आनंद देणारा; तान्हाजी मालुसरेंच्या वंशज शीतल मालुसरेंची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरून अभिवादन केले आहे, "प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, धैर्य-शौर्य-न्याय-परोपकाराची शिकवण देणाऱ्या आदर्श माता, राजनीती तसेच युद्धकलेत निपुण असणाऱ्या वीरमाता, जिजाबाई भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!" तर मंत्री जयंत पाटील यांनी अभिवादन करताना 'स्वराज्याचं स्वप्न डोळ्यांत पेरणाऱ्या जिजाऊंना जयंतीदिनी मानाचा मुजरा!' असे ट्विट केले आहे.

  • #राजमाताजिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती #शिवाजीमहाराज घडविले.स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली.तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला.

    जयंतीदिनी जिजाऊंना मुजरा. https://t.co/i20dp4mOmD pic.twitter.com/GsJtrq3KoX

    — महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आमदार रोहित पवार यांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या लाल महालाला भेट देऊन जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेल अभिवादन केले. इतिहासातील महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी यावेळी ताज्या झाल्या आणि छाती अभिमानाने भरुन आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊंना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन, असे ट्विट त्यांनी केले आहे.

हेही वाचा - पाहा...पानीपत युद्धावेळी कसा होता मावळ्यांचा युद्धसराव

'सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तनासाठी या माऊलीने एक महान राजा घडविला. महाराष्ट्राच्या आराध्य वीरमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीदिनी साष्टांग दंडवत!', असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याशिवाय अनेकांनी #जिजाऊजयंती #जिजाऊजन्मोत्सव या हॅशटॅगखाली सोशल मीडियावर जिजाऊंना अभिवादन केले आहे.

Intro:Body:

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध स्तरातून अभिवादन

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज 12 जानेवारी जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला होता. त्यांच्या जयंती निमित्त विविध स्तरातून अभिवादन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरून राजकीय नेत्यांसह अनेकांनी जिजाऊंना अभिवादन केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरून अभिवादन केले आहे, "प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, धैर्य-शौर्य-न्याय-परोपकाराची शिकवण देणाऱ्या आदर्श माता, राजनीती तसेच युद्धकलेत निपुण असणाऱ्या वीरमाता, जिजाबाई भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!" तर मंत्री जयंत पाटील यांनी अभिवादन करताना 'स्वराज्याचं स्वप्न डोळ्यांत पेरणाऱ्या जिजाऊंना जयंतीदिनी मानाचा मुजरा!' असे ट्विट केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या लाल महालाला भेट देऊन जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रातिमेल अभिवादन केले. इतिहासातील महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी यावेळी ताज्या झाल्या आणि छाती अभिमानाने भरुन आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊंना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन, असे ट्विट त्यांनी केले आहे.

'सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तनासाठी या माऊलीने एक महान राजा घडविला. महाराष्ट्राच्या आराध्य वीरमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीदिनी साष्टांग दंडवत!', असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याशिवाय अनेकांनी #जिजाऊजयंती #जिजाऊजन्मोत्सव या हॅशटॅगखाली सोशल मीडियावर जिजाऊंना अभिवादन केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.