ETV Bharat / state

अल्पावधित देशाच्या राजकारणात छाप उमटवणारे उमदे नेतृत्व

राजीव सातव हे २०१४ मध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले होते. सध्या ते राज्य सभेचे खासदार होते. याच सोबत राजीव सातव हे अखिल भारती काँग्रेस कमिटीचे सचिव आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून पक्षाचे काम पाहात होते. मात्र, कोरोनाशी लढा देणाऱ्या राजीव सातव यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले.

अल्पावधित देशाच्या राजकारणात छाप उमटवणारे उमदे नेतृत्व
अल्पावधित देशाच्या राजकारणात छाप उमटवणारे उमदे नेतृत्व
author img

By

Published : May 16, 2021, 10:38 AM IST

Updated : May 16, 2021, 10:44 AM IST

मुंबई - काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. सातव हे गेल्या २० दिवसांपासून कोरोनाने संक्रमित होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमेगॅलो या विषाणूची त्यांना बाधा झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

शनिवारी राजीव यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. अखेर रविवारी पहाटे सातव यांची प्राणज्योत मालवली. राजीव सातव हे काँग्रेस नेते राहूल गांधी यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जात होते. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा राजकीय प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. राजीव सातव हे २०१४ मध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले होते. सध्या ते राज्य सभेचे खासदार होते. याच सोबत राजीव सातव हे अखिल भारती काँग्रेस कमिटीचे सचिव आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून ते पक्षाचे काम पाहात होते.

राजीव सातव यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा-

राजीव शंकरराव सातव यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७४ ला झाला. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. तसेच घरातूनच राजकारणाचा वारसा लाभलेले राजीव सातव हे २०१४ मध्ये पहिल्यांदा हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत गेले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. सध्या ते गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून कार्य पाहात होते. तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मध्ये गुजरातची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेसने निवडणुकीत चांगले यश मिळवले होते. तसेच त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीतही जबाबदारी पार पाडली होती. याच बरोबर राजीव सातव यांनी 2010 ते 2014 या काळात भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषवले होते. तर २००८ ते २०१० या कालावधित त्यांनी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्व केले होते.

‘संसदरत्न’ राजीव

हिंगोलीच्या खासदारपदी असताना राजीव सातव यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले होते. त्याचबरोबर मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत त्यांनी आवाज उठवला होता. त्याच्या या कामाची दखल घेत त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राज्यसभेवर वर्णी

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र 2020 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.

Last Updated : May 16, 2021, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.