ETV Bharat / state

Mumbai Crime: लाइक्सच्या ५०-१०० साठी पार्टटाइम जॉबच्या नादात लाइफची कमाई गमवली; सायबर चोरट्यांच्या टोळीला अटक - Mumbai Police

आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटनासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर भामट्यांकडून पार्ट टाईम जॉब देण्याच्या नावाखाली व्हिडीओ लाईक करण्याचे टास्क देऊन फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा टास्कमुळे अनेकांची बँक खाती रिकामी झाली. त्यामुळे अशा ऑनलाईन टास्कच्या सापळ्यात अडकू नका, असे आवाहन मुंबई पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी, पोलीस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांनी केले आहे.

Mumbai Crime News
टास्कमुळे फसवणूक
author img

By

Published : May 31, 2023, 9:27 PM IST

माहिती देताना पोलीस उपायुक्त

मुंबई: शहरात फसवणूक करणारे दिवसेंदिवस नवीन नवीन शक्कल लढवून लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणूक करणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या-आवळण्यात पथकाला यश आले. ऑनलाईन टास्क प्रकरणांमध्ये तिघांना अटक केली आहे. ज्यांची नावे कल्पेश मेढेकर (वय २७), मनोज नेरुरकर (३८) आणि सुभाष नागम (४५) अशी असून त्यांनी घाटकोपरमधील व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपमार्फत गुंतवणूक करायचे आमिष दाखवत सुरुवातीला फायदा मिळवून दिला. नंतर त्यांना १० लाख ८७ हजार रुपयांना फसवण्यात आले.

राजस्थानी टोळीला अटक : आरोपीचा तपास पोलिस निरीक्षक शीतल मुंढे करत आहेत. त्यांच्याकडून इम्पोर्टर एक्सपोर्टर कोडच्या सर्टिफिकेट झेरॉक्स प्रती, जीएसटी प्रमाणपत्राच्या प्रती, २१ चेक बुक ४३ विविध कंपन्यांचे स्टॅम्प, १३ आधार कार्डच्या झेरॉक्स व पॅन कार्ड झेरॉक्स हस्तगत करण्यात आली. मोठ्या शिताफीने पूर्व विभाग सायबर पोलिसांनी राजस्थानी टोळीला अटक केली. नोकरीची जाहिरात करत या टोळीने अनेकांची फसवणूक केली आहे.

लाइक्सच्या ५०-१०० साठी लाइफची कमाई गमवाली : कुलाबा पोलिसांच्या हद्दीतही व्हिडीओ लाईकसाठी एका इंटेरियर मॅनेजरला ऑनलाइन टास्क रोड यूट्यूब लाईकच्या देत फसवणूक केली. यामाध्यमातून जवळपास २५ लाख ३५ हजार ७५० रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे. मिलिंद शेट्टे (वय ५५), गोरबहादूर सिंग (५२), संतोष शेट्टे (४८), लक्ष्मण सीमा (३७), गुप्ता खान आणि तुषार आजवानी (३८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अधिक तपास अधिकारी समीर लोणकर आणि प्रकाश गवळी व पथक करत आहे.

यूट्युब लाइक करा, पैसे कमवा : स्नेह शक्तावत ऊर्फ आदित्य जैन (२४), महावीर सिंह दारोगा ऊर्फ रोशन (२२) आणि देव गुर्जर (२७) अशी राजस्थानी टोळीतील आरोपींची नावे असून तिघांचा शोध सुरु आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे यूट्युब लाइक करा, पैसे कमवा अशी जाहिरात टाकत नोकरी करताना अधिक पैसे कमावण्याची संधी मिळेल, असे आमिष दाखवले. टेलिग्रामवरून लिंक पाठवत टास्क देऊन २७ लाख २० हजार ९०० रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक महेश जाधव आणि निरीक्षक वैशाली श्रावगी यांनी तांत्रिक तपास करत मीरा रोड भाईंदर परिसरातून या त्रिकुटाला गजाआड केले.

अशा सापळ्यात अडकू नका: ऑनलाईन टास्कच्या नावाखाली पार्ट टाईम जॉबला भुलून अनेकांचे बँक खाते रिकामे झाले. त्यामुळे या सापळ्यात अडकू नका, असे आवाहन पोलिस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांनी केले आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये 170 अशा प्रकारचे गुन्हे घडले आहे. तर दहा लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झालेले 50 गुन्हे असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Thane crime शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देण्याच्या नावाने ७५ लाखांचा गंडा तिघांवर गुन्हा दाखल
  2. Kota Online Fraud Case मुंबईत बनावट फर्म करून शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक पोलिसांनी पाच आरोपीच्या आवळल्या मुसक्या
  3. Crime News सोने पडले महागात बनावट कस्टम अधिकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीला घातला ३६ लाखांचा गंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.