मुंबई - माझ्या हिंदू धर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल, असे म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवी दिशा स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्याचे अनावरण आज झाले. गोरेगाव येथे मनसेचे राज्य अधिवेशनातून राज ठाकरे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आज पुन्हा मशिदीच्या आजानवर प्रश्न उपस्थित करत भोंगे बंद करा, असा सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले, प्रत्येकांनी आपला धर्म आपल्या घरात ठेवावा, आमच्या आरतीचा कोणाला त्रास होत नाही तर तुमच्या नमाजचा त्रासही होता कामा नये, असे राज म्हणाले.
बांगलादेशी मुसलमानांनी बंगाली भाषेच्या मुद्द्याची मागणी पुढे केली होती. पण, सध्या बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी खूप वाढली आहे. बांगलादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून देण्यासाठी केंद्र सरकरचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज्यभरात सीएए व एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चावर टीका करत 9 फेब्रुवारी बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावे, यासाठी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.