ETV Bharat / state

राज ठाकरे यांनी भाजप सोबत जायला हवे - गुरु मॉं कांचन गिरी - etv bharat maharashtra

हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरु मॉं कांचन गिरी व जगद्गुरु सूर्याचार्य मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना, गुरु मॉं कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी राज ठाकरे यांनी भाजप सोबत जायला हवे, असे त्या म्हणाल्या.

v
v
author img

By

Published : Oct 17, 2021, 3:01 PM IST

मुंबई - हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरु मॉं कांचन गिरी व जगद्गुरु सूर्याचार्य मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना, गुरु मॉं कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी राज ठाकरे यांनी भाजप सोबत जायला हवे, असे सांगत त्या सोमवरी (दि. 18) सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या मुंबईतील निवासस्थानी भेट घेणार आहेत.

सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व बुडवले

आज हिंदुत्व मागे जात आहे. हे हिंदुत्व मजबूत करण्यासाठी हिंदुराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी मी येथे आले असून प्रत्येक घरांमध्ये हिंदू झेंडा फडकवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज ठाकरे यांचा वारंवार उल्लेख केला. यापूर्वी त्या 1995 ला बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसते, ते बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील. बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते आणि ते वाघाप्रमाणेच राहत होते, असेही त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे महाविकासआघाडी सोबत सत्ता स्थापनेमध्ये असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्ता स्थापनेसाठी ते मुस्लिमांसोबत गेले व त्यांनी हिंदुत्व बुडवले, असे म्हणत त्यांनी पुढे बोलण्यास नकार दिला.

कदाचित उत्तर भारतीयांविरुद्ध अज्ञानातून राज ठाकरे लढा देत असतील

राज ठाकरे यांनी वारंवार उत्तर भारतीयांविरुद्ध बंड पुकारले. तरीही राज ठाकरे हे गैरसमजुतीतून अशा पद्धतीने उत्तर भारतीयांविरुद्ध वागत आहेत, असे गुरु मॉं कांचन गिरी म्हणाल्या. राज ठाकरे यांचा उत्तर भारतीयांविरुद्ध लढा हा योग्य नाही, कदाचित अज्ञानातून हे सर्व करत असतील तर त्यांचे मनपरिवर्तन केले जाईल. पण, हिंदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढे यावे, असे गुरु मॉं कांचन गिरी यांनी म्हटले.

हेही वाचा - ...अब किसके नसीब से महंगाई बढ रही है! राष्ट्रवादीचा पंतप्रधानांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.