ETV Bharat / state

अँटिलिया प्रकरणाच्या तपासात केंद्राने हस्तक्षेप करावा, अनेक नावे पुढे येतील - राज ठाकरे

माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी कारण ह्या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल ह्याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल. आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ ,अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली

केंद्राने हस्तक्षेप करावा, अनेक नावे पुढे येतील - राज ठाकरे

author img

By

Published : Mar 21, 2021, 12:38 PM IST

मुंबई - मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया बाहेर स्फोटकांसह आढळून आलेल्या कार प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, मूळ मुद्दा बाजूला जात आहे. हे प्रकरण फार वेगळे आहे. त्यांच्या घराबाहेर पोलिसांना बॉम्ब ठेवायला लावणेही क्षुल्लक गोष्ट नाही, त्यामुळे या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करून केंद्रीय तपास यंत्रणांकडून निस्पक्षपणे तपास करावा, अशी मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

परबीरसिंह यांच्या लेटरबॉम्बने राज्यात खळबळ उडाली आहे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीरसिंह यांनी पत्रातून केला होता. त्यानंतर विरोधकासंह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा आणि पक्ष नेतृत्वानेही त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा अशी मागणी आजच्या पत्रकार परिषदेत केली आहे.

राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, की परबीरसिंह यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप केले. अशी घटना म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्याविरोधात वसुलीबाबतची माहिती उजेडात आणणे यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात घडली असेल असे वाटत नाही. परबीरसिंह यांना एक वर्ष झाले असेल, त्यामुळे १२०० कोटी दिले असतील, अशी शंकाही त्यांनी यावेळी उपस्थित केली,

राज्यभरातून किती वसुली-

एका आयुक्तांकडून हा आकडा समोर आला, तर मग राज्यभरातून किती वसुली याची चौकशी झाली पाहिजे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायला हवा, आणि परबीरसिंह यांच्या पत्रासह देशमुखांनी १०० कोटींची वसुली करण्याच्या सुचना केल्या त्याबाबतची चौकशी झाली पाहिजे,असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुळ विषयाला बगल-

या प्रकरणात मुळ विषय़ाला बगल दिली जात आहे. अंबानीच्या घराबाहेरील स्कॉर्पियो प्रकरणाला बगल दिली जाता कामा नये, कारण, बॉम्ब हे दहशतवादी ठेवत असतात पोलीस बॉम्ब ठेवतात, हे पहिल्यांदाच ऐकले असल्याचे राज म्हणाले. सुशांत प्रकरणाप्रमाणे हा तपास भरकट चालला आहे. मूळ मुद्दा अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह गाडी कोणी ठेवली? त्या गाडीत ठेवलेले जिलेटेने आले कुठून? गाड्यांबाबत माहिती समोर आली पाहिजे असेही राज म्हणाले. जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी

परबीरसिंहाना का हटवले?

या संपूर्ण प्रकऱणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. मात्र यांना का हटवले हे सरकारने का सांगितले नाही,? ते या प्रकरणात सहभागी होते तर त्यांची चौकशी करण्या ऐवजी त्यांना का हटवले? असा सवाल राज ठाकरे यांनी केला

वाझे प्रकरणात पाहिले असता, ख्वाजा युनूस प्रकरणात १७ वर्षे हा व्यक्ती निलंबित होता. त्यानंतर भाजप-सेनेचे सरकार आले. त्यानंतर वाझेंचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यांना शिवसेनेत कोण नेले? तसेच वाझेंना पोलीस खात्यात रुजू करा असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. याचा अर्थ वाझे मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा माणूस. तसेच मुख्यमंत्री आणि अंबांनीचेही मधुर संबंध आहेत, ते शपथ विधीला हजर राहिले होते. मग त्यांच्या घराबाहेर बॉम्बची सापडते आणि ती गाडी पोलिसांनी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप करावा-

हे प्रकरण वाटते तेवढे साधे नाही. त्यामुळे केंद्राकडून याची निपक्षपाती चौकशी व्हायला हवी, तसे झाल्यास मी फटाक्यांची माळ लावेन, असे म्हणत राज ठाकरे पुढे म्हणाले की, केंद्राने या प्रकरणाचा छडा लावला तर यात अनेकजण आत जातील. मुकेश अंबानीच्या सुरक्षेसाठी इस्त्रालयी सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच मध्यप्रदेश पोलिसांची सुरक्षा आहे, असे असताना तिथे गाडी ठेवली जाते. त्यांना लिहलेले पत्र वाचले असता तो धमकी देणारा आदराणे बोलतो का? तो माणूस गुजराती लकबीमध्ये बोलतो असेही म्हटले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पत्र लिहण्याचे धाडस पोलीस करू शकत नाहीत, असेही राज यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे,

ज्या मुख्यमंत्र्यांचे अंबानींशी संबंध आहेत, तिकडे पोलीस पैसे खायला कशाला जातील.. त्यामुळे हे प्रकरण वेगळे आहे. ही गाडी कोणी ठेवली आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली. त्यामुळे केंद्राने या प्रकरणाचा तपास करावा. अशी पुन्हा एकदा त्यांनी मागणी केली..

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, कोरोना वाढतोय , मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. बेरोजगारी वाढली आहे. पोलिसांना भ्रष्टाचारी आहेत म्हटल जाते , मात्र, जर गृहमंत्रीच अशा प्रकारे बारमध्ये जाऊन पैसे गोळा करायला लावत असतील तर ही सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट असल्याचेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.