ETV Bharat / state

'कलम 370 रद्द'वर राज ठाकरेंची 'ही' प्रतिक्रिया - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

गेल्या काही दिवसातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय, असे ट्वीट करत राज ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज ठाकरे
author img

By

Published : Aug 5, 2019, 10:06 PM IST

मुंबई - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये घटनेतून कलम 370 हटवण्याची शिफारस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली. त्यानंतर राज्यसभेत बराच गदारोळ झाला. विरोधकांनी या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली. तर काही लोकांनी या निर्णायाचे स्वागत केले आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारवर कडाडून हल्ला करणाऱ्या राज ठाकरेंनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गेल्या काही दिवसातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय, असे ट्वीट करत राज ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबरोबरच सरकारच्या या निर्णयाचे शिवसेनेकडूनही जोरदार स्वागत करण्यात आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण करत मोदी सरकारचे कौतुक केले.

  • #Article370Scrapped #Kashmir
    गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !

    After a long time, the Central Govt makes an exceptional decision !

    — Raj Thackeray (@RajThackeray) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर मोदी सरकारच्या कट्टर विरोधकांपैकी आम आदमी पक्ष आणि तेलगू देसम पक्षानेही निर्णयाचे स्वागत केले आहे. एआयएडीएमके, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, अकाली दल, लोकजनशक्ती पार्टी, आरपीआय, शिवसेना या पक्षांनी कलम 370 रद्द करणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Intro:अकोला - भूसंपादनाचा मोबदला कमी मिळाल्याने पाच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर घेतले विष या बातमीतील जिल्हाधिकाऱ्यांचा बाईट, कृपया हा वापरावा. Body:अकोला - भूसंपादनाचा मोबदला कमी मिळाल्याने पाच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर घेतले विष या बातमीतील जिल्हाधिकाऱ्यांचा बाईट, कृपया हा वापरावा. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.