ETV Bharat / state

राज ठाकरेंकडून मोदींचे वस्त्रहरण; 'फेकू' संबोधत केली सरकारची पोलखोल

author img

By

Published : Apr 6, 2019, 11:55 PM IST

Updated : Apr 7, 2019, 12:59 AM IST

नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची चांगली संधी मिळाली होती. मात्र, त्यांना या संधीचे सोने करता आले नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

मुंबई - गुढीपाडव्यानिमित्त शिवाजीपार्क मैदानावर आयोजित सभेत राज ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. नोटाबंदी, डिजिटल इंडिया, गोमांसबंदी, सरकारी योजना आणि भाजपची जाहिरातबाजी आदी विषयांवरून त्यांनी नरेंद्र मोदींना आणि भाजपला झोडपून काढले. यावेळी त्यांनी मोदींशी संबंधित अनेक व्हिडीओ क्लिप्स दाखवत सरकारची पोलखोल केली.

नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची चांगली संधी मिळाली होती. मात्र, त्यांना या संधीचे सोने करता आले नाही, असे राज ठाकरे म्हणाले. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे खोटे बोलत आहेत, हे सांगणारे अनेक व्हिडिओ दाखवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिला होता. तो कसा खोटा आहे, हे दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत व्हिडिओ सादर केला. डिजिटल व्हिलेज म्हणून विदर्भातल्या हरिसाल या गावाचे उदाहरण त्यांनी दिले. त्या गावात असलेली विदारक स्थिती राज ठाकरेंनी उघडी पाडली. या गावातील आरोग्य केंद्र, इंटरनेट सुविधा, बँकेच्या सुविधा याबाबत उपस्थितांना चित्रफिती दाखवल्या.

गावकऱ्यांनी गावाची आणि डिजिटल इंडियाची सत्य स्थिती मुलाखतीत सांगितल्याच्या चित्रफिती ठाकरेंनी दाखवल्या. हरिसाल गावात जागोजागी मोबाईलसाठी टॉवर उभे केले आहेत. मात्र, वायफायला रेंजच नाही. डिजिटल इंडिया काय आहे? हेच आम्हाला माहीत नाही, असे उत्तर ग्रामस्थांनी दिले. स्वाईप मशीनही अनेक दुकानांमध्ये नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. एवढेच काय अनेकांकडे एटीएम कार्ड नाहीत, बँकेने एटीम कार्ड दिले नसल्याचेही गावकऱ्यांनी म्हटले आहे. काही गावकऱ्यांकडे तर मोबाईलही नाही. मग, मोदींनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा कसा केला? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. हरिसालची जाहिरात काय केली होती आणि परिस्थिती काय आहे हे राज ठाकरेंनी सांगितले.

सरकारच्या जाहिरातीत जो मुलगा आहे तोही मनसेने शोधला. या मुलानेही आपल्याकडे स्वाईप मशीन, पेटीएम, एटीएम कार्ड नसल्याचे सांगितले. 'मी लाभार्थी, होय हे माझं सरकार' म्हणणाऱ्या या जाहिरातीतील मॉडेलकडेही डिजिटल इंडियाच्या काहीही सुविधा पोहचल्या नाहीत, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. यानंतर उपस्थितांनी 'चौकीदार चोर है' अशा घोषणा दिल्या. लोकांना किती फसवायचं? किती लुटायचं याला काही मर्यादाच मोदींनी ठेवल्या नाहीत, असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

काँग्रेसच्या सगळ्या जुन्या योजनांची नावे भाजपने बदलल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. प्रधानमंत्री जनधन योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना, सरदार पटेल नॅशनल अर्बन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, असे योजनांची नावे बदलली. काँग्रेसनेही असेच केल्याचे ठाकरे म्हणाले. राजीव गांधी किंवा पंतप्रधान या नावांशीवाय दुसरी नावे देता येत नाही का? दुसरी माणसे आले नाहीत का? इतकी कर्तृत्वमान व्यक्ती देशामध्ये जन्माला आले, तरी एकाचेही नाव योजना किंवा महामार्गांना देता येत नाही? असा सवाल त्यांनी केला.

आधारकार्डबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुटप्पी भूमिका त्यांनी दोन व्हिडिओमधून लोकांना दाखवली. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याअगोदर आधार योजनेला विरोध होता. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी याच योजनेचे गुणगान गायल्याचे त्यांनी व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून दाखवले. गंगा नदी साफ करण्याच्या मोहिमेला २० हजार कोटी वापरले गेले. मात्र, नदी साफ झाली नाही. असे ते म्हणाले. गंगा नदी स्वच्छ करण्याच्या मागणीसाठी अग्रवाल १११ दिवस उपोषणाला बसले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मोदी त्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत. गंगा नदी साफ करण्यासाठी जी समिती नेमली आहे, त्या समितीच्या एकाही बैठकीसाठी नरेंद्र मोदी गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मुद्रा लोन ५९ मिनिटांत मिळणार या योजनेतून एचडब्ल्यू या अहमदाबादमधील खासगी कंपनीला आर्थिक लाभ दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. कॅपिटल वर्ड प्रायव्हेट लिमिटेड ही गुजरातमधील खासगी कंपनी असून तीचा संचालक विकास शहा आणि अखिल हंडा ही व्यक्ती २०१४ च्या निवडणुकीवेळी मोदींच्या जवळ होती, असे ते म्हणाले. मुद्रा लोन अंतर्गत लोन हवे असल्यास १०८८ रुपये खासगी कंपनीला भरायचे आणि प्रथम त्यांची परवानगी आणायची मग कर्ज मंजूर होणार, असा व्हिडिओ त्यांनी दाखवला.

गोमांस बाळगल्यावरून उत्तरप्रदेशमध्ये एका व्यक्तीला मारहाण झाली. मात्र, नंतर ते गोमांस नसल्याचे उघड झाले. राजस्थानमध्ये अन्नाविना ७० हजार गायींचा मृत्यू झाला, असेही राज यांनी यावेळी सांगितले.

Intro:Body:
MH_ RajThakre_Polkhol6.4.19

जाहीर सभेत राज ठाकरेंकडून मोदींचे वस्त्रहरण

व्हीडीओ, फोटो, बातम्या दाखवून मोदी सरकारच्या योजना कार्यक्रमांचा पर्दाफाश

राज ठाकरेंनी केली डिजीटल इंडीयाची पोल- खोल

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगली संधी मिळाली. मात्र या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिला होता. तो कसा खोटा आहे ते दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत एक व्हिडिओ सादर केला.

आपल्या भाषणा दरम्यान राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं खोटं बोलत आहेत त्याच्या काही व्हिडिओ क्लिप्सही सादर केल्या.

डिजिटल व्हिलेज म्हणून विदर्भातल्या हरिसाल या गावाचं उदाहरण दिलं होतं. तिथला आढावा राज ठाकरेंनी सादर केला आणि तिथलं हेल्थ सेंटर, तिथे वायफाय आहे का? या सगळ्याचा आढावा सादर केला. या गावात जागोजागी टॉवर लावले आहेत मात्र या ठिकाणी वायफायला रेंजच नाही असा आरोप राज ठाकरेंनी व्हिडिओ आढाव्याद्वारे केला. डिजिटल काय आहे? हेच आम्हाला माहित नाही असं उत्तर गावकऱ्यांनी दिलं आहे. स्वाईप मशीनही अनेक ठिकाणी अनेक दुकानांमधून मिळाली नाहीत. एवढंच काय अनेकांकडे एटीएम कार्ड नाही, बँकेने कार्ड दिलं नसल्याचंही व्हिडिओत गावकऱ्यांनी म्हटलं आहे. काही गावकऱ्यांकडे मोबाईलही नाही आणि मोदींनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा कसा केला? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. हरिसालची जाहिरात काय केली होती आणि परिस्थिती काय आहे हे राज ठाकरेंनी सांगितले.

सरकारच्या जाहिरातीत जो मुलगा आहे तो मॉडेलही मनसेने शोधला. या मुलानेही आपल्याकडे स्वाईप मशीन, पेटीएम, एटीएम कार्ड आपल्याकडे नसल्याचे सांगितले आहे. मी लाभार्थी होय हे माझं सरकार म्हणणाऱ्या मॉडेलकडेही डिजिटल इंडियाच्या काहीही सुविधा पोहचल्या नाहीत असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. यानंतर उपस्थितांनी चौकीदार चोर है अशाही घोषणा दिल्या. लोकांना किती फसवायचं? किती लुटायचं याला काही मर्यादाच मोदींनी ठेवल्या नाहीत असाही आरोप राज ठाकरेंनी केला आणि पंतप्रधान कसं खोटं बोलत आहेत असं राज ठाकरेंनी दाखवून दिलं.

काँग्रेसच्या सगळ्या जुन्या योजनांची नावे बदलली. प्रधानमंत्री जनधन योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना, सरदार पटेस नॅशनल अर्बन योजना, प्रधानमंत्री आवास योजना असे योजनांची नावे बदलली. काँग्रेसवाल्यांनीही असेच केले. राजीव गांधी किंवा प्रधानमंत्री शिवाय दुसरी नावे देता येत नाही का? दुसरी मानसं आले नाहीत का? इतकी कर्तृत्वमान माणसं देशामध्ये जन्माला आले, तरी एकाचेही नाव योजना किंवा महामार्गांना देता येत नाही?

आधारकार्डबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते, याबाबत त्यांनी दोन व्हिडिओ दाखवले. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याअगोदर आणि पंतप्रधान झाल्यानंतर आधारकार्डच्या योजनेवर काय बोलले ते दाखवले गेले.

गंगा नदी साफ करण्याच्या मोहिमेला २० हजार कोटी वापरले गेले. अग्रवाल नावाचे गृहस्थ १११ दिवस उपोषणाला बसले होते. ज्यादिवशी त्यांचा मृत्यू झाला, त्यादिवशी नरेंद्र मोदी गेले. गंगा नदी साफ करण्याची जी कमिटी नेमली आहे, त्या कमिटीच्या एकही मिटिंगसाठी नरेंद्र मोदी गेले नाहीत.

मुद्रा लोन 59 मिनिटात योजनेतून HW या अहमदाबाद मधील खाजगी कंपनीला आर्थिक लाभ दिल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले,
कॅपिटल वर्ड प्रायव्हेट लिमिटेड ही गुजरात मधील खासगी कंपनी. हिचा संचालक विकास शहा आणि अखिल हंडा ही व्यक्ती 2014 च्या निवडणुकीवेळी मोदींच्या जवळ होती.
मुद्रा लोन अंतर्गत लोन हवं असल्यास 1088 रुपये प्रथम या खासगी कंपनीला भरायचे
प्रथम त्यांची परवानगी आणायची मग कर्ज मंजूर होणार असा विडीओ त्यांनी दाखवला.
गोंमास बंदी वरून 100 लोकांना मारल्या फोटो बातम्या दाखवून उत्तर प्रदेश मध्ये एका व्यक्तीला मारले मात्र नंतर ते बीफ नसल्याचे उघड झाले.राजस्थान मध्ये अन्नविना 70 हजार गायी मेल्या.छत्तीसगड मध्ये भाजपच्या व्यक्तीकडे 200 गायी मेल्याचे फोटो त्यांनी दाखवले.

देशात एखादा आलेला झटका देशाचा भविष्य नाही घडवू शकतो. स्वत:च्या मंत्रिमंडळाला विश्वासात न ठेवता नोटाबंदी केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.Conclusion:
Last Updated : Apr 7, 2019, 12:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.