ETV Bharat / state

चुकीचं काम केल्यास वाभाडे, चांगल काम केलं तर कौतुकही - राज ठाकरे - आम्हालाच विचारता पुढे काय झाले

सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी या शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज टाकरे यांनी केले. सरकारने जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यांचे वाभाडे काढले जाईल, आणि चांगले काम केले तर त्याचे कौतुकही करायला हवे असेही ठाकरे म्हणाले.

Raj thackeray comment on MNS shadow cabinet
राज ठाकरे
author img

By

Published : Mar 9, 2020, 1:57 PM IST

Updated : Mar 9, 2020, 8:05 PM IST

नवी मुंबई - सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी या शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज टाकरे यांनी केले. सरकारने जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यांचे वाभाडे काढले जाईल, आणि चांगले काम केले तर त्याचे कौतुकही करायला हवे असेही ठाकरे म्हणाले. मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशीत आयोजित केलेल्या मेळाव्यात राज ठाकरे बोलते होते. १४ वर्षाच्या काळात अनेक चढउतार पाहिले. १३ आमदार निवडून आले. मात्र, काहीजण विचारतात १३ आले अन् पुढे काय झाले? ज्यांनी ५०, ६० वर्ष राज्य केले त्यांचा दिल्लीत एकही निवडून आला नाही. त्यामुळे लाटा येतात आणि जातातही असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

चुकीचं काम केल्यास वाभाडे, चांगल काम केलं तर कौतुकही - राज ठाकरे

मनेसेच्या शॅडो कॅबिनेटची आज घोषणा केली. यानंतर राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरेंनी या सर्वांचे अभिनंदन केले. तसेच १४ वर्षाच्या काळात जे कार्यकर्ते पक्षासोबत राहिले त्यांचेही राज ठाकरेंनी आभार मानले. अनेकांना हाच प्रश्न पडला आहे की, पराभव होऊनही राज ठाकरेंबरोबर लोक राहतात कसे? असेही राज ठाकरे म्हणाले. कामावर मतदाने होणे गरजचे आहे. भावनांवर मतदान झाले तर सुधारणा कशा होणार असेही म्हणाले. जे सत्तेवर बसलेत त्यांच्याकडून लोक अपेक्षा का ठेवत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

आज जे शॅडो कॅबिनेट जाहीर केले आहे, त्यांना चांगले काम करावे. मात्र, मला न सांगता त्यांनी पत्रकार परिषदही घेऊ नये असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. पराभव होऊनही माझ्याबरोबर लोक राहिले. मनसेने आजपर्यंत जेवढी आंदोलने केली तेवढी कोणीच केली नाहीत. त्या आंदोलनाचा रिझल्टही दिला असल्याचे ठाकरे म्हणाले.

Last Updated : Mar 9, 2020, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.