मुंबई - पीएमसी आणि सीटी बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या खातेधारकांनी शुकवारी राज ठाकरे यांची मागाठाणे येथे भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी खातेधारकांचे म्हणणे ऐकून घेत आज होणाऱ्या सभेत या बद्दल बोलून यावर काही करता येईल का? असे आश्वासन राज यांनी खातेधारकांना दिले.
हेही वाचा - पीएमसी बँक खातेदारांची मुख्यमंत्र्यांच्या सभेत निदर्शने
पीएमसीसह सीटी बँकेवर आरबीआयने अनिश्चीत काळासाठी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे हजारो गुंतवणुकदारांचे कोट्यावधी रुपये या बँकांमध्ये अडकले आहेत. आपल्याच हक्काचे पैसे मिळत नसल्याने खातेदार हतबल झाले आहेत. या बँकातील बहुतांश खातेदार हे ज्येष्ठ नागरिक असून आयुष्याची जमा पुंजी बँकेत अडकल्याने त्यांना याचा सर्वाधीक त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - पीएमसी बँकेची कागदपत्रे फॉरेन्सिक ऑडिट विभागाकडे; पडताळणी सुरू
याच पार्श्वभूमीवर या खातेधारकांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेत आपली समस्या मांडली. जवळपास अर्धा तास चाललेल्या बैठकीत 30 हुन अधिक खातेधारक राज यांना भेटले. त्यामुळे राज आज होणाऱ्या सभेत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यावर बोलण्याची शक्यता आहे.