ETV Bharat / state

'नसेल झेपत तर राजीनामे द्या...' पदाधिकाऱ्यांकडून पदवीधर मतदार नोंदणी न झाल्याने राज ठाकरे यांचा संताप

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. पदवीधर निवडणूक (Graduate Constituency Election) आढावा बैठकीमध्ये राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

Raj Thackeray
राज ठाकरे यांचा संताप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 3:25 PM IST

मुंबई Raj Thackeray : आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. अशात महाराष्ट्रातील मनसे आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांचं लक्ष असतं ते त्यांचा कोअर मतदार असलेल्या सिनेट निवडणुकांवर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे दोन्ही नेते याच विद्यार्थी दशेतील राजकारणातून पुढे आले. त्यामुळं या दोन्ही नेत्यांचं सिनेट निवडणुकीवर विशेष लक्ष असतं. या निवडणुकीच्या दृष्टीने पदवीधर मतदार नोंदणी दोनही पक्षांकडून केली जात आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांनी पदवीधर मतदारांच्या फार कमी नोंदण्या केल्याने, आज बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

'झेपत नसेल तर राजीनामे द्या'...: काही महिन्यांपूर्वी सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख यांना मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांच्या नोंदणी करून घेण्याचे आदेश दिले होते. जास्तीत जास्त अर्ज भरून घ्या असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता निवडणुका तोंडावर असताना, एकूण किती नोंदणी झाल्या? याचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी या सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत फार कमी पदवीधर मतदारांनी नोंदण्या केल्याचं समोर आलं. त्यामुळं राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. 'झेपत नसेल तर राजीनामे द्या.' अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना झापलं आहे.

राज ठाकरे नेमके काय आदेश देणार : या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वार्डमधून राज ठाकरे यांनी किमान 500 पदवीधर मतदार नोंदणी करण्याचं टार्गेट दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात कार्यकर्त्यांकडून 200 चा आकडा देखील पार झालेला नाही. वेळोवेळी बैठका घेऊन सुद्धा, मार्गदर्शन करून सुद्धा इतक्या कमी प्रमाणात मतदारांच्या नोंदणी झाल्यानं राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना झापलं आहे. तसंच मतदारांमध्ये जाताना काही अडचणी येत आहेत का? मतदारांच नेमकं काय म्हणणं आहे? याचा आढावा देखील राज ठाकरे या बैठकीच्या माध्यमातून घेत आहेत. दरम्यान, या बैठकीतून नेमकं काय साध्य होतं? आणि मतदार नोंदणीची पुढची रणनीती कशी असेल याबाबत राज ठाकरे नेमके काय आदेश देतात? हे आज संध्याकाळपर्यंत या बैठकीनंतर स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; काय आहे कारण? वाचा सविस्तर
  2. सरकार नुसतं तोंड वाजवायलाच’, राज ठाकरे यांचा मराठी पाट्यांवरुन हल्लाबोल
  3. MNS vs BJP : दीपोत्सवावरुन फुटले फटाके; मनसे-भाजपामध्ये जुंपली, आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.