ETV Bharat / state

मुंबई उपनगरात पावसाचा जोर, एकाचा मृतदेह तरंगताना आढळला - mumbai suburbs rain dead body found

मुंबईत गुरूवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत वेधशाळेच्या कुलाबा येथे 26.2 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 36.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मुंबई महापालिकेच्या पावसाची नोंद करणाऱ्या केंद्रांवर करण्यात आलेल्या नोंदीनुसार शहरात 37.43, पश्चिम उपनगरात 34.04 तर पूर्व उपनगरात 52.06 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

rain in mumbai suburbs on thursday, one dead body found
मुंबई उपनगरात पावसाचा जोर
author img

By

Published : Jun 18, 2020, 9:47 PM IST

मुंबई - येथे गुरूवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. तसेच पवई तलावात एकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत गुरूवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत वेधशाळेच्या कुलाबा येथे 26.2 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 36.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मुंबई महापालिकेच्या पावसाची नोंद करणाऱ्या केंद्रांवर करण्यात आलेल्या नोंदीनुसार शहरात 37.43, पश्चिम उपनगरात 34.04 तर पूर्व उपनगरात 52.06 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात दादर, धारावी पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड तर पश्चिम उपनगरात कांदिवली, मालवणी आणि वांद्रे या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

पावसादरम्यान शहरात 5, पूर्व उपनगरात 5 तर पश्चिम उपनगरात 8 अशा 18 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्या. तसेच शहरात 1, पूर्व उपनगरात 3 तर पश्चिम उपनगरात 1 अशा 5 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनांची नोंद झाली.

3 जण जखमी -

गुरूवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास झालेल्या पावसादरम्यान, जोगेश्वरी मेघवाडी येथील एक रिकाम्या असलेल्या इमारतीच्या भिंतींचा भाग कोसळला. त्यात सकीरा शेख (वय - 22), तौशिक शेख (वय - 28), फातिमा कुरेशी (वय - 60) हे तीन जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

मृतदेह सापडला -

पवई येथील विहार तलावात सकाळी 11 वाजताच्या सुमारास एक मृतदेह तरंगताना निदर्शनास आला. याबाबतची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तो मृतदेह पाण्यातून काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात पाठवण्यात आला. यातील मृताचे वय सुमारे 38 वर्ष आहे. याबाबत अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.