ETV Bharat / state

मध्य रेल्वेचा ६४ वा रेल्वे सप्ताह, १९४ कर्मचारी विविध पुरस्काराने सन्मानित

१६ एप्रिल १८५३ ला मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे गाडी धावली होती. यानिमित्त १० एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंतचा हा आठवडा रेल्वे सप्ताह म्हणून साजरा केला जातो

मध्य रेल्वेचा ६४ वा रेल्वे सप्ताह
author img

By

Published : Apr 14, 2019, 11:09 AM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या ६४ व्या रेल्वे सप्ताह कार्यक्रमात १९४ रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी सन्मानित केले. यासोबतच संपूर्ण मुंबई विभागाला दक्षता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१६ एप्रिल १८५३ ला मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे गाडी धावली होती. यानिमित्त १० एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंतचा हा आठवडा रेल्वे सप्ताह म्हणून साजरा केला जातो. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि टेलीकॉम, मेडिकल आणि स्टोर्स असे पुरस्कार जिंकले. इंजिनिअरिंग आणि मॅकेनिकल विभागात भुसावळ आणि पुणे विभागाने बाजी मारली. नागपूर विभागाने कर्मशियल पुरस्कार, भुसावळ विभागाने सिक्युरिटी, सोलापूर विभागाने सुरक्षितता तर पुणे विभागाने वारंवारता पुरस्कार जिंकला.

मध्य रेल्वेचा ६४ वा रेल्वे सप्ताह

स्वच्छतेसाठी भुसावळ आणि नाशिक विभागाला पुरस्कार देण्यात आला. या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या विविध रेल्वेच्या विकास कामांवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी प्रकाश टाकला. यावेळी मध्य रेल्वेच्या प्रमुख विभागाचे अध्यक्ष, मध्य रेल्वेचे अधिकारी, मध्य रेल्वेच्या महिला कल्याण संघटन विभागाच्या अध्यक्षा ममता शर्मा, कार्यकारी समितीचे सदस्य, सेवानिवृत्त अध्यक्ष, सदस्य आणि महाव्यवस्थापक उपस्थित होते.

Intro:मध्य रेल्वेचा 64 रेल्वे सप्ताह कार्यक्रमात 194 रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी सन्मानित केले. संपूर्ण मुंबई विभागाला दक्षता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.Body:16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे गाडी धावली होती. यानिमित्त 10 एप्रिल ते 16 एप्रिल हा आठवडा रेल्वे सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि टेलीकॉम, मेडिकल, स्टोर्स आदी पुरस्कार जिंकले. इंजिनिअरिंग आणि मॅकेनिकल विभागात भुसावळ आणि पुणे विभागाने बाजी मारली. नागपूर विभागाने कर्मशियल पुरस्कार, भुसावळ विभागाने सिक्युरिटी, सोलापूर विभागाने सुरक्षितता तर पुणे विभागाने वारंवारता पुरस्कार जिंकला. बेस्ट स्थानक स्वच्छतेसाठी भुसावळ आणि नाशिक विभागाला पुरस्कार देण्यात आला.Conclusion:2018- 19 या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या विविध रेल्वेच्या विकास कामांवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी प्रकाशझोत टाकला.
यावेळी मध्य रेल्वेच्या प्रमुख विभागाचे अध्यक्ष, मध्य रेल्वेचे अधिकारी, मध्य रेल्वेच्या महिला कल्याण संघटन विभागाच्या अध्यक्षा ममता शर्मा,
कार्यकारी समितीचे सदस्य, सेवानिवृत्त अध्यक्ष, सदस्य आणि महाव्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.