मुंबई - गर्दीचा हंगाम पाहता रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच ट्रॅक मॉनिटरिंगसाठी पाळत ठेवण्यासाठी मध्यरेल्वेकडून ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
सणांचा हंगाम सुरू झाले असून मुंबईहून आपापल्या गावी परप्रांतीय मजूर जात आहे. यावेळी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर व अपघात टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
अत्याधुनिक ड्रोन
रेल्वेद्वारे वापरण्यात येणारे हे ड्रोन अत्याधुनिक असून जमिनीपासून 200 मीटर उंचीवर 2 किलोमीटर अंतरापर्यंत 25 मिनिटांसाठी उडण्यास सक्षम आहेत. एवढेच नाही तर यामध्ये असलेल्या जीपीएस यंत्रणेमुळे आपणास नेमके कोठे पोहोचायचे आहे ते समजायला सोपे होते. हे ड्रोन विशेषतः मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये वापरले जाईल आणि यासाठी आरपीएफला प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
रेल्वे यार्ड, रेल्वे परिसरातील संवेदनशील ठिकाणांवरही देखरेख
गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि अपघात टाळणे याव्यतिरिक्त या ड्रोनचा वापर रेल्वे यार्ड, रेल्वे परिसरातील संवेदनशील ठिकाणांवर देखरेख करण्यासाठीही केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.
हेही वाचा - नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे - फ्लेचर पटेल