मुंबई Railway Megablock: 10 डिसेंबर 2023 रोजी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरिता मध्य रेल्वे कडून मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. (Central and Harbor Railway Megablock) ठाणे ते कल्याणच्या आणि डाऊन दिशेकडील जलद मार्गावर सकाळी 10 वाजून 40 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणाहून सकाळी 9 वाजून 30 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 45 मिनिटांपर्यंत ज्या लोकल सुटणार आहेत त्या सर्व जलद लोकल ठाणे आणि कल्याण या दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. यामुळे कळवा मुंब्रा आणि दिवा या रेल्वे स्थानकांवर लोकल ट्रेन काही काळ थांबतील त्याचा परिणाम लोकल ट्रेनवर होणार असून त्या दहा मिनिटे उशिराने धावतील. तर सकाळी 10 वाजून 28 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत कल्याण पासून मुंबईकडे येणाऱ्या जलद लोकल सेवा ठाणे स्थानकापर्यंत धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. नेहमीच्या रेल्वे स्थानकांवर त्या थांबणार नाहीत. दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे थांबून त्यापुढे मुलुंड स्थानकांवर अप दिशेने वळवण्यात येतील. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन दहा मिनिटे उशिराने धावतील. (Mumbai Railway Megablock)
'या' रेल्वेगाड्या सहाव्या मार्गावर वळविल्या जातील: मुंबई आणि दादरकडे येणाऱ्या अप दिशेच्या मेल आणि एक्सप्रेस या ट्रेनमध्ये रेल्वेच्या ठाणे आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सहाव्या मार्गावर वळविण्यात येतील. तर मुंबईवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे आणि कल्याणच्या फलाट क्रमांक पाचच्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक: कुर्ला वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यानुसार सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत कुर्ल्यापासून ते वाशीकडे जाणाऱ्या लोकल सेवा करिता मेगाब्लॉक असेल. त्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराज स्थानक येथून 10 वाजून 34 मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून 36 मिनिटापर्यंत वाशीकडे, बेलापूरकडे, पनवेलकडे सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील. तर पनवेल, बेलापूर तसेच वाशी येथून सकाळी 10 वाजून 16 पासून ते दुपारी 3 वाजून 47 मिनिटापर्यंत मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील.
'या' मार्गांवर प्रवास करण्याची परवानगी: हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेगा ब्लॉकच्या काळामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे रेल्वे स्थानक वाशी तसेच नेरूळ रेल्वे स्थानकावरून प्रवास करण्यास परवानगी आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना दिली आहे.
हेही वाचा:
- Mumbai Railway Project: रेल्वे प्रकल्प रद्द केल्याने लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसेल; प्रकल्प रद्द करू नयेत- प्रवासी संघटनेची मागणी
- Mumbai Railway: पाकिटमारांचा त्रास ते दिव्यांगाच्या अडचणी, केंद्रीय अर्थसंकल्पाकडून रेल्वे प्रवाशांच्या काय आहेत अपेक्षा?
- हृदयाचा ठोका चुकवणारा Video; रेल्वे फाटक तोडून टेम्पो सरळ रेल्वे रुळावर!