मुंबई : रविवार असूनही मुंबईकरांना बाहेर पडताना मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे लागणार आहे. कारण मुंबईमध्य रेल्वे आज मेगा ब्लॉक घेणार आहे. विद्याविहार-ठाणे ५वी आणि ६वी लाईन सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाउन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
या मार्गावरील सेवा काही वेळेपुरती रद्द : कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द केली जाईल. याशिवाय वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागात विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
वीस वर्षांपासून मेगाब्लॉक नियमित : मेगा ब्लॉक साधारणत: 20 ते 25 वर्षापासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरू झाला. त्याचे कारण असे की, जेव्हा ओव्हरड वायर आणि रूळ मार्ग आणि विविध तांत्रिक गोष्टीमुळे रेल्वेच्या अडचणी समोर यायला लागल्या आहेत. या अडचणींना सोडवण्यासाठी मध्य रेल्वे महामंडळाद्वारे निर्णय घेतला गेला की, दर रविवारी देखभाल आणि दुरुस्ती केल्याशिवाय बारा महिने विनाअडथळा रेल्वे धावू शकणार नाही, असा रेल्वे महामंडळाचा दावा आहे. रविवारी मेगाब्लॉक आयोजित केला जातो. कारण रेल्वे यंत्रणा खूप मोठी आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर आणि इतर तांत्रिक बाबी असतात. ज्यांची वेळेवर दुरुस्ती किंवा देखभाल व्हायला हवी. तांत्रिक दोष त्याच वेळेला ठीक केले, तर प्रचंड लोकसंख्येला घेऊन जाणारी लोकल व्यवस्थित चालेल.
हेही वाचा