ETV Bharat / state

Railway Electrification : विद्युतीकरणामुळे मध्य रेल्वेच्या 4 विभागांची झाली चांदी, वर्षभरात 1266.56 कोटी रुपयांची बचत - Railway Electrification of Mumbai Division

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सरकार संस्था सर्वच प्रयत्न करत आहेत. भारतीय रेल्वेकडूनही असाच प्रयत्न सुरू आहे. त्यात रेल्वेला यशही मिळत आहे. जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी भारतीय रेल्वे युद्ध पातळीवर काम करत आहे. वर्ष 2030 पूर्वी नेट झिरो कार्बन एमिटर बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर या विभागात विद्युतीकरण करून तब्बल 1266.56 कोटी रुपयांची बचत केली आहे. त्याच प्रमाणे लाखो कार्बन फूट प्रिंटची बचत केली आहे अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Railway Electrification
विद्युतीकरणामुळे 1266.56 कोटी रुपयांची बचत
author img

By

Published : Mar 7, 2023, 6:59 AM IST

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन 3 फेब्रुवारी 1925 ला हार्बर मार्गावरील तत्कालीन बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला दरम्यान चालली. सुरुवातीला मुंबई विभागात 1500 व्होल्ट डीसीवर विद्युतीकरण करून त्यावर रेल्वे सेवा सुरू होती. 2001 मध्ये डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शन करण्याचे काम सुरू होऊन 2016 मध्ये ते काम पूर्ण झाले. 2019 मध्ये मुंबई विभागत 555.5 किमी मार्ग विद्युतीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे वार्षिक 1.64 लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत होत आहे. मुंबई विभागातील 100 टक्के विद्युतीकरणामुळे वार्षिक 556.56 कोटी रुपयांची बचत होते.

पुणे विभागात 246 कोटींची बचत : पहिली इलेक्ट्रिक ट्रेन डेक्कन क्वीन 1 जून 1930 रोजी मुंबई ते पुणे दरम्यान धावली. सुरुवातीला पुणे विभागाचे विद्युतीकरण 1500 व्होल्ट डीसीवर करण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शनमध्ये रूपांतर 2004 मध्ये सुरू झाले आणि ते 2008 - 09 मध्ये पूर्ण झाले. आतापर्यंत पुणे विभागात 531 किमी मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झाले आहे. यामुळे पुणे विभागाच्या इंधन बिलात लक्षणीय घट झाली आहे. जे प्रति महिना सरासरी 2303.04 किलो लिटर आहे. ज्यामुळे वार्षिक 0.733 लाख टन कार्बन फूटप्रिंट कमी करते. पुणे विभागातील 100 टक्के विद्युतीकरणामुळे वार्षिक 246 कोटी रुपयांची बचत होत आहे.

सोलापूर मध्ये 122 कोटींची बचत : मध्य रेल्वेचा सोलापूर हा विभाग 140 वर्षांहून अधिक जुना आहे. मुंबई चेन्नई, मुंबई बेंगळुरू आणि मुंबई हैदराबाद मार्गाच्या मुख्य मार्गावर स्थित आहे. सोलापूर विभागात 100 टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे वार्षिक इंधन बिलात सुमारे 122 कोटी रुपयांची कपात झालेली आहे. त्यासोबतच चालू आर्थिक वर्षात सुमारे 57,114,67 टन कार्बन उत्सर्जन कमी झाला आहे.

नागपूरमध्ये 342 कोटी रुपयांची बचत : मुंबई - हावडा आणि दिल्ली - चेन्नई मार्गाच्या मुख्य मार्गावर नागपूर विभाग येतो. नागपूर विभागात 100 टक्के विद्युतीकरण साध्य करून, रेल्वेने वाहतुकीची पर्यावरणपूरक पद्धत सुनिश्चित केली गेली आहे. त्यामुळे आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी झाले आहे. देशासाठी मौल्यवान परकीय चलनाची बचत झाली आहे. याशिवाय, ट्रॅक्शन बदलांमुळे होणारा अडथळा टळून विभागीय क्षमता देखील वाढली आहे. तसेच 100 टक्के विद्युतीकरणामुळे वार्षिक इंधन बिलात सुमारे 342 कोटी रुपये कपात झालेली आहे. त्याबरोबरच वार्षिक सुमारे 1.05 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी झाला आहे.

हेही वाचा: Holi 2023 होळीसाठी मध्य रेल्वेच्या ९० विशेष गाड्या गाड्यांचे बुकिंग आजपासून सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.