ETV Bharat / state

नाममात्र शुल्क देऊन वापरा रेल्वेचे हायस्पीड वायफाय; रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची घोषणा

author img

By

Published : Mar 5, 2021, 9:04 AM IST

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने प्रवशांसाठी वायफायचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. यामुळे प्रवाशांना हायस्पीड इंटरनेटचा वापर करता येणार आहे.

WiFi
वायफाय

मुंबई - देशभरात साडेपाच हजारांहून अधिक रेल्वे स्थानकांवर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (रेलटेल)ने नि:शुल्क वायफाय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता याच कंपनीने 4 हजार रेल्वे स्थानकांवर हायस्पीड इंटरनेट वायफाय सुविधेसाठी 'रेलवायर वायफायचा प्रीपेड प्लॅन लॉन्च' केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना 30 मिनिटानंतर सशुल्क प्लॅन खरेदी करून रेल्वे स्थानकावर हायस्पीड इंटरनेट सुविधा मिळवता येणार आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने वायफाय सुविधा लॉन्च केली

4 हजार रेल्वे स्थानकांवर सुविधा सुरू -

रेल्वे स्थानकांना डिजिटल करण्याच्या दृष्टिकोनातून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने एक मिनी रत्न योजना आणली होती. ज्यात रेल्वे स्थानकावर वाय-फाय सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. सध्या देशभरात 5 हजार 950 हजारांहून अधिक स्थानकांनर नि:शुल्क वायफाय सुविधा उपलब्ध आहे. रेलवायर नावाने रेल्वेने ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. आता रेल्वे प्रवाशांना स्थानकावर 30 मिनिटांनंतर सुद्धा वायफाय सुविधा घेता येणार आहे. फक्त त्यासाठी प्रवाशांना सशुल्क प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. सध्या देशभरात 4 हजार रेल्वे स्थानकांवर
प्रीपेड प्लॅन लॉन्च करण्यात आले आहेत.

34 एमबीपीएसपर्यंत हायस्पीड वायफाय -

रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा वापरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 1 एमबीपीएसच्या गतीने प्रतिदिन 30 मिनिटपर्यंत नि:शुल्क वाय-फायची सुविधा मिळते. 34 एमबीपीएसपर्यंत हायस्पीड वायफाय सुविधा मिळण्यासाठी रेल्वे प्रवाशांना नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे. सध्या ही योजना 4 हजार रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही रेल्वेस्थानकात ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती 'रेलटेल'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला यांनी ईटीव्ही भारतला दिली.

असे असणार वायफाय डेटा प्लॅन-

5 जीबी डेटा / प्रतिदिवस 10 रुपये
10 जीबी डेटा / प्रतिदिवस 15 रुपये
10 जीबी डेटा / 5 दिवस 20 रुपये
20 जीबी डेटा / 5 दिवस 30 रुपये
30 जीबी डेटा / 10 दिवस 50 रुपये
60 जीबी डेटा / 30 दिवस 70 रुपये

असा करा खरेदी करा प्लॅन -

रेल्वे स्थानकावर हाय स्पीड वाय-फायसाठी आवश्यकतेनुसार प्रवाशांना हा सशुल्क प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. ऑनलाइन प्लॅनची खरेदी करण्यासाठी नेट बँकिंग, वॉलेट क्रेडिट कार्ड, सारख्या इतर पर्यायांचा वापर करता येणार आहे. राज्यातील ५३९ रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा सुरू आहे. देशातील पाच हजार 950 रेल्वे स्थानकांत वाय-फाय सेवा प्रवाशांना मिळत असून दरमहा साधारण ८२०० टीबीचा वापर प्रवाशांकडून करण्यात येतो. प्रति प्रवासी सरासरी २८३ एमबी डाटा वापरला जात आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.