ETV Bharat / state

रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या रोजच्या खोळंब्यावर श्वेतपत्रिका काढावी - खासदार राहुल शेवाळे - दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे

रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या रोजच्या  खोळंब्यावर श्वेतपत्रिका काढावी तसेच तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या जनरल मॅनेजरपदी मराठी अधिकाऱयाची नियुक्ती करण्याची मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

खासदार राहुल शेवाळे
author img

By

Published : Jul 7, 2019, 7:45 PM IST

मुंबई - गेल्या एका महिन्यापासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे. परिणामी लाखो मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या रोजच्या खोळंब्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

खासदार राहुल शेवाळे

रेल्वेच्या अनियमितपणामुळे नोकरदारवर्गाला कामावर जायला तसेच घरी परतण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे अनेकांना कामावर लेटलतीफचा शिक्का बसत आहे. तर काहींचे त्यादिवशीचे वेतनही कापण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्र्यालयाकडून श्वेत पत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली आहे.

मागील तीन महिन्यापासून रेल्वेचे जनरल मॅनेजरचे पद रिक्त आहे. या पदावर मराठी अधिकाऱयाचीच नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजरचे पद रिक्त असल्यामुळे रेल्वेच्या अनियमिततेची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नाही. गैरमराठी अधिकाऱयांना येथील समस्यांची जाण नसल्याने ते कायमस्वरुपी तोडगा काढू शकले नाही. त्यामुळे मराठी व्यक्ती पदावर असल्यास मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.

Intro:
मध्य रेल्वेचा रोजचा खोळंबावर श्वेत पत्रिका प्रकाशित करण्यात यावी

खासदार राहुल शेवाळे

काही दिवसापासून मध्य रेल्वे बंद पडत असल्याने यावर रेल्वे मंत्र्यालायकडून श्वेत पत्रिका प्रकाशित करण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलीBody:
मध्य रेल्वेचा रोजचा खोळंबावर श्वेत पत्रिका काढण्यात यावी

खासदार राहुल शेवाळे

काही दिवसापासून मध्य रेल्वे बंद पडत असल्याने यावर रेल्वे मंत्र्यालायकडून श्वेत पत्रिका प्रकाशित करण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली

.3 महिन्यापासून जनरल मॅनेजर च पदरिक्त असल्याने या ठिकाणी मराठी अधिकारी त्या पदावर नियुक्त करावा अशीही मागणी राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालायकडे केली आहे.

गेल्या एक महिन्यापासून मध्य रेल्वे तांत्रिक कारणाने किंवा इतर बाबीं मुळे सतत बंद पडत आहे.यामुळे लाखो मुंबईकर चाकरमान्यांना याच्या त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे चाकरमान्यांना कामावर जायला तसेच घरी परतण्यास खूप उशीर होत आहे.अनेकांना कामावर जायला लेट लतीफ चा शिक्का बसत आहे.तर काहींचे त्यादिवशीचे वेतन कापण्यात आल्याचेही समोर आले आहे.यावर दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी यावर रेल्वे मंत्र्यालायकडून श्वेत पत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली आहे.

त्याच बरोबर मध्य रेल्वेला जनरल मॅनेजर हे पदरिक्त आहे त्यामुळे रेल्वेच्या विस्कळीत पणावर जबाबदारी घेण्यासाठी कोणीही नाही या ठिकाणी लवकरात लवकर त्या पदावर अधिकारी नियुक्त करावा आणि तोही मराठी अधिकारी असावा अशीही मागणी राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालायकडे केली आहे.जे अधिकारी येतात ते अमराठी असल्याने त्यांना मुंबईच्या समस्येविषयी कमी जाण असल्याने यावर ते कायस्वरूपी तोडगा काढू शकले नाही.मराठी व्यक्ती या पदावर असल्यास मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल असे ही शेवाळे यांनी म्हंटले आहे.

Byte-- राहुल शेवाळे, खासदार
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.