मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने प्रक्षेपीत केलेला कार्यक्रम म्हणजे थोर क्रांतिकारकांचा अपमान आहे. ती संबंधित वृत्तवाहिनी काँग्रेसची एजंट असल्याचा जनतेचा आरोप आहे. त्यामुळे त्या वृत्तवाहिनीने जनतेची माफी मागावी, असे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हणाले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा कार्यक्रम एका वृत्तवाहिनीने प्रसारीत केल्यावर समाजाच्या सर्वच स्तरांतून मोठी टीका झाली. त्यानंतर या वृत्तवाहिनीने सावध भूमिका घेत केवळ कार्यक्रमाच्या नावाविषयीच दिलगिरी व्यक्त केली. मात्र, एवढेच पुरेसे नसून, या वाहिनेने संबंधित कार्यक्रम सर्व डिजिटल माध्यमांवरून काढून टाकावा. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा शेवाळे यांनी दिली आहे. यासाठी रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे आणि गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली एका शिष्टमंडळाने संबंधित कार्यालयात जाऊन निवेदन दिले आहे.