मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणात (Sheena Bora murder case ) राहुल मुखर्जीचा मुंबई सत्र नयायालयात आज पुन्हा इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे त्यांच्या वतीने उलट तपासणी दरम्यान पुन्हा राहुल मुखर्जी संदर्भात धक्कादायक खुलासा (Shocking disclosure regarding Rahul Mukherjee) केला आहे. राहुल मुखर्जी यांनी विविध नावावर 20 सिमकार्ड्सचा वापर (Rahul Mukherjee was using 20 SIM ) केल्याचा धक्कादायक आरोप पुराव्यासाहित इंद्राणीच्या वकिलांनी कोर्टात केला. यातील 3 नं आपले असल्याचे राहुल मुखर्जीने मान्य केले आहे. उद्या पुन्हा इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांच्या वतीने राहुल मुखर्जी यांची उलट तपासणी करण्यात येणार आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime
एकच नंबर वापरतो - राहुल मुखर्जी -- राहुल मुखर्जी याच्या CDR मध्ये रेकॉर्ड मोबाईल नंवर झालेल्या संभाषणावर उलटतपासणी अनेक वेगवेगळ्या लोकांसोबत बोलण्यासाठी अनेक सिम आणी हॅण्डसेटचा वापर राहुल करत होता. मात्र मी एकच नंबर आणी मोबाईलचा वापर केला असा राहुल मुखर्जीने असा कोर्टात दावा केला आहे. इंद्राणीच्या वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यात मात्र अनेक सिम आणी नं कोर्टासमोर आले यावर चक्क मला आठवत नाही अशी राहुलनं कोर्टात नंतर म्हटले होते. मला आठवत नाही.मला माहित नाही अशी राहुल देतोय उडवाउडवीची उत्तरं राहुलनं 20 सिमकार्ड्सचा वापर केल्याचा धक्कादायक आरोप पुराव्यासाहित इंद्राणीच्या वकिलांनी कोर्टात सादर केला नंतर यातील 3 नं आपले असल्याचं राहुलनं मान्य केले आहे.
राहुलची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य असल्याची माहिती - 24 सप्टेंबर 2015 ला खार पोलिसांनी राहुल मुखर्जीचा मोबाईल फोन सिझ केला होते. पंचनाम्यात नोंद असलेली ही तारीख याच मोबाईलच्या तांत्रिक चाचणीत या कालावधीत जवळपास 4 हजार मेसेजेस रिट्राईव्ह झाले असल्याचे कोर्टात स्पष्ट झाले आहे. अखेर राहुल मुखर्जीने मान्य केले आहे. शीना आणी राहुल एकत्र रहात असताना त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य होती. अभिनेता अनुपम खेर यांच्या अकादमीत राहुलने 3 महिने अभिनय प्रशिक्षण घेतले. याचा खर्च पीटर मुखर्जी यांनी केला. राहुल हा प्रशिक्षित अभिनेता असल्याचा इंद्राणीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे.
काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.