मुंबई : अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. अदानी यांनी स्वत:च्या कंपनीत शेअरची गुंतवणूक केली आहे. आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता हवी आहे. जगामध्ये भारताची नाचक्की या प्रकरणामुळे झाली आहे. भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आदानीच्या कंपनीत चीन व्यक्तीची गुंतवणुक कशी? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत चीनमधील एका व्यक्तीनं गुंतवणूक केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अदानी भारतात विकास प्रकल्प, संरक्षण क्षेत्रात काम करत आहे. मात्र, त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीनं गुंवतणूक कशी केली? असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर खुलासा करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
सर्व प्रकरणाची चौकशी करा : देशामध्ये सध्या जी -20 चं वातावरण आहे. जगभरातील अनेक देशातून अनेक तज्ञ या बैठकीसाठी देशात येत आहे. या वातावरणात जगातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये आज अदानी समूहातील गुंतवणी बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळं देशाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत खुलासा करणं गरजेचं आहे. मात्र, पंतप्रधान यावर बोलायला तयार नसल्यास म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी जेसीपी स्थापन करून करावी, अशी मागणी त्यांनी केली .
मोदींचे अदानी कुटुंबांशी संबंध : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अदानी कुटुंबांशी संबंध असल्याचं एका जागतिक वृत्तपत्रात म्हटलयं. शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी त्यांनी आपल्याच कंपनीत शेअरची खरेदी केल्याचं माध्यमात म्हटलयं. या पैशाच्या जोरावरच अदानी विमानतळ, पोर्ट्स खरेदी करत आहेत. हे कुणाचे पैसे आहेत? असं राहुल गांधी म्हणाले. या संदर्भात संसदीय संयुक्त समितीच्या वतीने कारवाई करू, असं पंतप्रधानांनी जाहीर करायला हवं, असं देखील गांधी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरलं : अदानीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षानं आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरलंय. आज सकाळीच काँग्रेस पक्षातर्फे आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. ज्यामध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेडा यांनी पुन्हा एकदा अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता. याच विषयावर राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार दिली.
बैठकीला 28 पक्षांचे सुमारे 63 नेते उपस्थित : इंडिया आघाडीत सामाविष्ट पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार (सीट वाटप) हे ठरवणं सर्वात महत्त्वाचं आहे. इंडिया आघाडीत सहभागी पक्ष अनेक राज्यांत एकमेकांच्या विरोधात आहेत. यापूर्वी काँग्रेस नेते पीएल पुनिया यांनी म्हटलं होतं की लोकसभा निवडणूक I.N.D.I.A. आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यानंतरच पंतप्रधानपदाचं नाव निश्चित करता येईल. विरोधी पक्षांची युती असलेल्या इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) ची तिसरी बैठक आजपासून मुंबईत सुरू होत आहे. ही बैठक दोन दिवस (३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत) चाणार आहे. या बैठकीला 28 पक्षांचे सुमारे 63 नेते उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं.
काँग्रेसनं पंतप्रधानांना घेरलं : आज काँग्रेसतर्फे एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेडा आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा -
- INDIA Alliance Meeting Mumbai : हेमंत सोरेन यांच्यासह अरविंद केजरीवाल मुंबईत दाखल, इंडियाच्या बैठकीसाठी नेत्यांची मांदियाळी
- Special Session Of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार पाच बैठका
- Political leaders Reaction on India Meeting : 'इंडिया' आघाडीच्या बैठकीतील खर्चावर मंत्री उदय सामंत यांची टिका, तर आदित्य ठाकरे म्हणाले...