मुंबई: राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती याबाबतचं एक दस्तावेज देखील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून दाखवलं मात्र वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोंदविण्यात आला.
राहुल गांधी यांचा निषेध: राहुल गांधी यांच्या निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राहुल गांधी यांचा निषेध केला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
वीर सावरकरांचा अपमान: सावरकरांच्या अपमान केल्यानंतर बाळासाहेबांनीही मारले होते. वीर सावरकर यांचा अपमान नेहमीच काँग्रेसने केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही वीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्याचप्रमाणे राहुल गांधी देखील आता वीर सावरकरांचा अपमान करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता हा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशारा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
शंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे: राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा केलेला अपमान उद्धव ठाकरे यांना देखील मान्य नसेल. त्यांनीही याबाबत निषेध नोंदवावा असं यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनीही वीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर काँग्रेसचे नेते मनी शंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते याची आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना करून दिली.