ETV Bharat / state

राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, आम्ही त्यांच्या पाठिशी - बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांचं नेतृत्व हे एक समर्थ नेतृत्व आहे. हेच नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाणारे आहे. या देशाला तेच समर्थपणे नेतृत्व देऊ शकतात. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि अध्यक्षपदी स्वीकारावे, अशी मागणीही थोरात यांनी एक ट्विट करून आणि त्यानंतर राहुल गांधी यांना एक विनंतीचे पत्र लिहून केली आहे.

Rahul Gandhi most acceptable leader in Congress, should come back as party chief : Balasaheb Thorat
राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, आम्ही त्यांच्या पाठिशी - बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Aug 23, 2020, 8:32 PM IST

मुंबई - राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे, त्यांची गरज केवळ पक्षासाठी नाही तर देशासाठी आहे, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना केली आहे.

राहुल गांधी यांचं नेतृत्व हे एक समर्थ नेतृत्व आहे. हेच नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाणारे आहे. या देशाला तेच समर्थपणे नेतृत्व देऊ शकतात. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि अध्यक्षपदी स्वीकारावे, अशी मागणीही थोरात यांनी एक ट्विट करून आणि त्यानंतर राहुल गांधी यांना एक विनंतीचे पत्र लिहून केली आहे.

बाळासाहेब थोरात बोलताना...
अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. त्या हे पद कधीही सोडू शकतात, असे संकेत मिळाल्याने काँग्रेस देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसची धुरा सांभाळावी, अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर थोरात यांनीही राहुल गांधी यांना विनंती केली आहे.

सध्या अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांनीही आपल्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाच्या उभारणी संदर्भात आणि पक्षासाठी अत्यंत चांगलं काम केलेला आहे. त्यांना पाहिजे तोपर्यंत अध्यक्ष राहतील, परंतु काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांनी तयार झाले पाहिजे, देशाचे एकूणच हित लक्षात घेऊन त्यांनी यासाठीचा निर्णय घ्यावा, आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह

हेही वाचा - हिंदू धर्माला जाणीवपूर्वक अपकीर्त करणार्‍या ‘आश्रम’ या ‘वेब सिरीज’वर बंदी घालण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.