ETV Bharat / state

मुंबईत गटारात उतरलेल्या मनोरुग्णाची सुटका; पोलिसांनी घेतले ताब्यात - रघुनाथ कोळी

रघुनाथ निलेश कोळी नावाचा मनोरुग्ण आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील गटारात उतरला. त्याला गटारातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

मनोरुग्णाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान
author img

By

Published : Apr 23, 2019, 9:20 PM IST

मुंबई - आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील गटारात एक मनोरुग्ण उतरला. त्याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्याला या गटारातून बाहेर काढून चितळसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रघुनाथ निलेश कोळी (३५) असे या मनोरुग्णाचे नाव आहे.

मनोरुग्णाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान

रघुनाथ हा मंगळवारी दुपारी घोडबंदर रोड, मानपाडा, आर मॉल समोर, लॉकीम कंपनी येथील गटारात उतरला. त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहिले. त्यांनी त्याला बाहेर येण्यासाठी सांगताच तो बाहेर न येता गटारात शिरला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या मदतीने ही बाब वाहतूक पोलिसांना कळवली. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जवान दाखल झाले. त्यांनी रघुनाथला गटारातून बाहेर काढले. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची माहिती समोर येत असून सध्या त्याला चितळसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Intro:

मनोरुग्ण गटारात उतरला-बाहेर काढून दिले पोलिसांच्या ताब्यातBody:

मंगळवारी तळपत्या उन्हात सव्वा एक वाजण्याच्या सुमारास एका ३५ वर्षीय इसम गटारात उतरला. त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाहेर येण्यास सांगताच त्याने गटाराच्या आत शिरला. त्याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी, अग्निशमन दलाने पाचारण करून बाहेर काढले. त्याला चितळसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

रघुनाथ निलेश कोळी(३५) हा इसम मंगळवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड, मानपाडा, आर मॉल समोर, लॉकिम कंपनी येथील गटारात कोळी उतरला. त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिले. कोळी याला बाहेर येण्यासाठी सांगताच तो बाहेर न येत गटारात शिरला. विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या मदतीने ही बाब वाहतूक पोलिसांना कळविली. दरम्यान कोळी याला बाहेर काढण्यासाठी घटनास्तळी अग्निशमन दलाचे पथक आणि आपत्ती व्यवस्थापन जवानांनी मदत कार्य करीत रघुनाथ कोळी याला बाहेर काढले. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाद्वारे मिळाली. दरम्यान कोळी याला चितळसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.