ETV Bharat / state

कावेरी रिव्हर अॅथॉरिटीच्या धर्तीवर कृष्णा रिव्हर अॅथॉरिटी स्थापन करा- माजी मुख्यमंत्री चव्हाण

author img

By

Published : Aug 15, 2019, 1:04 PM IST

ज्या प्रमाणे कावेरी रिव्हर अथॉरिटी आहे, त्याच धर्तीवर राज्यात कृष्णा रिव्हर अॅथॉरिटी स्थापन करावी, अशी मागणी केली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबई - सांगली आणि कोल्हापूर भागात जी पूरस्थिती निर्माण झाली ती अत्यंत गंभीर आहे. आता भविष्यात चांगल्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 'धोरणात्मक बाब म्हणून ज्याप्रमाणे कावेरी रिव्हर अथॉरिटी आहे, त्याच धर्तीवर राज्यात कृष्णा रिव्हर अॅथॉरिटी स्थापन करावी,' अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. या भेटीत आपण मुख्यमंत्री फडवीस यांना काही सूचना केल्या असून त्यात कावेरीच्या धर्तीवर राज्यात कृष्णा रिव्हर अॅथॉरिटी स्थापन करावी आणि ही अॅथॉरिटी हाय पॉवर अथॉरिटी असावी म्हणजे यातून काही राजकीय निर्णय घेण्याचे टळेल. यातून केवळ तांत्रिक आणि धरणाच्या संदर्भात निर्णय घेता येतील, अशी आपण सूचना केली असल्याचेही चव्हाण म्हणाले.

केंद्राकडे जी ६ हजार ८०० कोटी रूपये निधी मागितलेले आहेत, ती रक्कम ही तशी कमी असली तरी ती केंद्राकडून केव्हा निधी येणार माहीत नाही, तोपर्यंत सरकारने आपल्या आस्कमिक निधीतून पैसे काढून राज्यातील जनतेला मदत करण्याची गरज आहे. जनावरे आणि पिकांचे जे नुकसान झालेले आहे, त्यासाठीची भरपाई दिली पाहिजे.

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात अनेक घरे ही आणि झोपड्याही उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना नवी घरे बांधून देणे आवश्यक आहे. त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आदी योजनेद्वारे सरकारने पावले उचचलून त्यांना घरे बांधून देण्याची गरज आहे. यासाठी सर्व कामकाज पाहण्यासाठी उच्च पदस्थ अधिकारी या कामासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांनी सध्या आपल्या एका विश्वासू आणि मुंबईतील आयुक्तांना हे काम पाहण्यासाठी दिलेले असले तरी ते पूर्णवेळ नसल्याने त्यांना यासाठी नीट काम करता येणार नाही. त्यामुळे एखादा कार्यक्षम अधिकारी यासाठी नियुक्त करणे गरजेचे असल्याचेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, परिस्थिती हाताळण्यात जे मंत्री कमी पडले त्यांच्याविरोधात सध्या प्रचंड असंतोष व्यक्त केला जात आहे. सांगली-कोल्हापूर या भागात इतकी गंभीर परिस्थिती असताना त्या ठिकाणी मदत व पुनवर्सन मंत्री, कोल्हापूर, सांगलीचे पालकमंत्री गायब होते. त्यातच काही असंवेदनशील वक्तव्य मंत्री करत आहेत.

आत्तापर्यंत जे झाले ते सोडून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देता येईल, अशी सूचनाही मी केली असल्याचेही माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.

Intro:कावेरी रिव्हर ॲथॉरिटीच्या धर्तीवर कृष्णा रिव्हर ॲथॉरिटी स्थापन करा- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
mh-mum-01-sahyadri-excm-prith-chavan-byte-7201153
(बाईट मोजोवरून पाठवला आहे..)
मुंबई, ता. १४ :
सांगली आणि कोल्हापूर भागात जी पूर परस्थिती निर्माण झाली ती अत्यंत गंभीर आहे. यासाठी आता भविष्यात चांगल्या उपाययोजना करण्यासाठी मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांना धोरणात्मक बाब म्हणून ज्या प्रमाणे कावेरी रिव्हर अथॉरिटी आहे, त्याच धर्तीवर राज्यात कृष्णा रिव्हर ॲथॉरिटी स्थापन करावी अशी मागणी केली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर पिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत आपण मुख्यमंत्री फडवीस यांना काही सूचना केल्या असून त्यात कावेरीच्या धर्तीवर राज्यात कृष्णा रिव्हर ॲथॉरिटी स्थापन करावी आणि ही ॲथॉरिटी हाय पॉवर अथॉरिटी असावी म्हणजे यातून राजकीय काही राजकीय निर्णय घेण्याचे टळेल आणि केवळ तांत्रिक आणि धरणाच्या संदर्भात निर्णय घेता येतील, अशी आपण सूचना केली असल्याचेही चव्हाण म्हणाले.
केंद्राकडे जे ६ हजार ८०० कोटी रूपये मागितलेले आहेत, ती रक्कम ही तशी कमी असली तरी ती केंद्राकडून केव्हा येईल माहित नाही, तोपर्यंत सरकारने आपल्या आस्कमिक निधीतून पैसे काढून राज्यातील जनतेला मदत करण्याची गरज आहे. विविध खात्यांना उपलब्ध केली पाहिजे, त्यात जनावरे आणि पिकांचे जे नुकसार झालेले आहे, त्या साठीची भरपाई दिली पाहिजे, सांगली, कोल्हापूर या जिल्हयात अनेक घरे ही आणि झोपडयाही उद्ध्वस्त झालेल्या आहे, त्यामुळे त्यांना नवी घरे बांधून देणे आवश्यक आहे. त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आदी योजनेसाठी सरकारने पावले उचचलून त्यांना घरे बांधून देण्याची गरज आहे. यासाठी सर्व कामकाज पाहण्यासाठी उच्च पदस्थ अधिकारी या कामासाठी पूर्णवेळ नेमण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी संध्या आपल्या एका विश्वासू आणि मुंबईतील आयुक्तांना हे काम पाहण्यासाठी दिलेले असले तरी ते पूर्णवेळ नसल्याने त्यांना यासाठी नीट काम करता येणार नाही. त्यासाठी मेसेज वेगळा जातो, त्यामुळे एखादा कार्यक्षम अधिकारी यासाठी नियुक्त करण्याची गरजेचे असल्याचेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले.
या दरम्यान परिस्थिती हाताळण्याएवेजी जे मंत्री कमी पडले त्यांच्याविरोधात सध्या प्रचंड असंतोष व्यक्त केला जात आहे. सांगली-कोल्हापूर या भागात इतकी गंभीर परिस्थिती असताना त्या ठिकाणी मदत व पुनवर्सन मंत्री,. पुण्याचे, सांगलीचे पालकमत्री गायब होते. त्यातच काही असंवेदनशील वक्तव्य मंत्री आहेत, त्यांना यादरम्यान लोकसंपर्काच्या कामातून दूर ठेवण्याविषयी मी सूचना केल्या आहेत. त्यामुळे यानिमित्ताने सरकारला ही एक चांगली संधी असून लोकांचे चांगले पुनवर्सन करता येऊ शकेल. आत्तापर्यंत जे झाले ते सोडून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देता येईल अशी सूचनाही मी केली असल्याचेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. Body:कावेरी रिव्हर ॲथॉरिटीच्या धर्तीवर कृष्णा रिव्हर ॲथॉरिटी स्थापन करा- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.