मुंबई : तंग कपड्यांवरून उर्फी जावेद हिच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार देखील वाघ यांनी केली होती. त्यानुसार उर्फीने पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर आपल्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त करत तिने महिला आयोगाकडे यांसदर्भात तक्रार दाखल केली. राजकीय स्वार्थापोटी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मला मारहाणीच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे माझ्यावर कधीही जीवघेणा हल्ला होऊ शकतो, असे उर्फीने म्हटले आहे.
-
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,"मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,"मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,"मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023
उर्फीला सुरक्षा पुरविण्याची सूचना : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत, मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून अभिनेत्री उर्फी जावेदला सुरक्षा पुरवण्याची सूचना दिली आहेत. तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे पत्रात नमूद केले आहे. मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याच्या सूचना चाकणकर यांनी दिल्या आहेत.
उर्फी जावेदची काय होती मागणी? यामध्ये अर्जदार उर्फी जावेद असे नमूद करते की, "मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझे राहणीमान आणि दिसणे व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे. असे असतानाही भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत. माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही. म्हणून मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला मुक्त संचाराचा हक्क दिला आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.
उर्फीची वाघ विरुद्ध पोलीस तक्रार : मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या पेहरावावर आक्षेप घेत भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपासून उर्फी जावेदवर बोचरी टीका करण्यास सुरूवात केली आहे. उर्फी आपल्या हाती सापडली तर तिचे थोबाड रंगविण्याची धमकीही वाघ यांनी दिली आहे. याबाबत उर्फीने तिच्या वकिलांमार्फत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रारही केली होती.
उर्फी जावेदला प्रसिद्ध करण्याची सुपारी ? : यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, उर्फी जावेदला प्रसिद्ध करण्याची सुपारी तर चित्रा वाघ यांनी घेतली नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. सध्या मीडियामध्ये उर्फी जावेद यांच्या वस्त्रावरून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वेगवेगळे वक्तव्य केले आहे. त्यावरून काँग्रेसच्या सव्वालाखे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, चित्रा वाघ ह्या जेवढ्या जोमात महिलांचे आवाज उठवतात तेवढ्याच जोरात त्या निमूटपणे शांतसुद्धा होतात. उर्फीच्या कपड्याभोवती गुरफटण्यापेक्षा महाराष्ट्रात महिलांचे अनेक प्रश्न आहेत, महिलांच्या त्या प्रश्नाकडे चित्रा वाघ कधीही लक्ष देत नाहीत. कंगना राणावत यांच्या बेताल वक्तव्यावर चित्रा वाघ या गप्प असतात.