मुंबई : राज्यातील दिव्यांग कर्मचारी मुंबईच्या प्रकाशन कार्यालयावर येऊन धडकणार आहेत. महावितरण कंपनीने कर्मचाऱ्यांना अन्यायकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ हजारो दिव्यांग कर्मचारी विविध मागण्यांसाठी उपोषण करणार (Protest of Disable Employees of Mahavitran) आहेत. प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेच्यावतीने हे आंदोलन 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत केले जाणार (Prakashgad office in Mumbai) आहे.
प्रकाशगड व प्रकाशगंगा कार्यालयासमोर आंदोलन : प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यातील विजेच्या संदर्भातील कार्यरत महावितरण व महानिर्मिती आणि महापारेषण या ठिकाणी कार्यरत 3000 दिव्यांग कर्मचारी अनेक वर्षापासून अन्याय सहन करत आहेत. त्यामुळेच एक नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईतील प्रकाशगड व प्रकाशगंगा या कार्यालयासमोर आंदोलन करणार (Protest of Prahar Divyang Employees Association) आहेत.
विविध मागण्यांसाठी आंदोलन : महावितरण महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही कामांमध्ये राज्यातील 36 जिल्हे मिळून सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिव्यांग वाहतूक भत्ता अद्यापही दिला गेलेला (Disable Employees of Mahavitran in Mumbai) नाही. तसेच गेल्या तीन महिन्यात झाले दिव्यांग कर्मचाऱ्यांना सक्षम बनवण्यासाठीचे मदत करणारे उपकरणे तंत्रज्ञान ते देखील दिलेले नाही. तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवा जेष्ठता व बिंदू नामावली ज्याला रोस्टर असे संबोधन केले जाते. ती देखील त्वरित करावी व यापूर्वी झालेल्या पदोन्नती मधील दिव्यांगांचा अनुशेष देखील त्वरित भरावा. अशा विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे नेते रवींद्र सोनावणे यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधतांना (Disable Employees of Mahavitran) दिली.