ETV Bharat / state

BJP Protest : भाजप आक्रमक! संध्याकाळपर्यंत राहुल गांधींनी माफी न मागितल्यास.... - स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य

भारतीय जनता पक्षाकडून दादर परिसरात आंदोलन करण्यात ( Bharatiya Janata Party Protest in Dadar ) आले. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधींचा निषेध
author img

By

Published : Nov 18, 2022, 1:50 PM IST

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून दादर परिसरात आंदोलन करण्यात ( Bharatiya Janata Party Protest in Dadar ) आले. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपकडून दादरमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा ( Insulting statement on freedom fighter Savarkar ) भाजप युवा मोर्चाकडून निषेध करण्यात आला. मुंबईतील दादर येथील काँग्रेस कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला.

तगडा पोलीस बंदोबस्त तैनात : राहुल गांधीनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्य अपमानजनक असल्याने भाजप युवा सेनेकडून मोर्चाचा इशारा दोण्यात आला आहे. आज संध्याकाळपर्यंत राहुल गांधींनी माफी न मागितल्यास भाजप राहुल गांधींची भारत जोडो यात्रा होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

ठाण्यात आंदोलन : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य ( Insulting statement on freedom fighter Savarkar ) केले. परिणामी शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन ( Shinde group agitation ) केले. राहुल गांधी यांची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न देखील आंदोलनकर्त्यांकडून केला ( Attempt to burn Rahul Gandhi effigy ) गेला. वीर सावरकर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक तेजस्वी तारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. परंतू सावरकरांबद्दल काँग्रेसच्या मनात जी खदखद आहे ती त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून वारंवार दिसून येते. असे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के,आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक यांच्यासह माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

पुण्यात आंदोलन : युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील ( Youth Congress General Secretary ) यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाबाहेर माफीवीर तसेच राहुल गांधी सादर केलेले पत्र फ्लेक्सच्या माध्यमातून लावण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या ( NCP women protest ) वतीने पुण्यातील लाल महल येथे ( held Lal Mahal in Pune ) गुन्हेगार नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत आंदोलन ( protest murder case of young Shraddha ) करण्यात आले. श्रद्धाच्या हत्या प्रकरणात देशभरामध्ये हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत आहेत. मात्र नराधमाला कुठलीही जात नसते, पंत नसतो, धर्म नसतो, त्यामुळे त्याला फाशी ( Demand execution of the criminal ) झालीच पाहिजे. परंतु गुन्हेगाराच्या आडून राजकारण करणाऱ्या भाजपाचा सुद्धा आम्ही निषेध करत आहोत. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली आहे. श्रद्धा हत्या प्रकरणात भाजपा जे आंदोलन करत आहे. त्यामध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्या अगोदरच लव जिहाद, धर्माचे तुकडे, हिंदू धर्म खत्रे मे असं भारतीय जनता पार्टी कडून या सर्व प्रकरणाचे राजकारण केले जाते. ते दुर्दैवी असून गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्यामुळे श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर हा खटला फास्ट कोर्टात चालवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.