मुंबई- खेतवाडी गणेश मंडळाच्या मुंबईचा सम्राट गणपती मंडळासमोर वडाळा येथील अलंकार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पथनाट्य सादर केले. यावेळी गणेश भक्त दर्शनाची रांग थांबवून हे पथनाट्य पाहण्यासाठी गर्दी करीत होते.
गणेशोत्सव काळात चांगले देखावे कलाकृती पाहण्यासाठी गणेश भक्त मंडळास भेटी देत गणेश बाप्पाचे दर्शन घेतात. वडाळा येथील अलंकार माहिती तंत्रज्ञान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेतवाडी गल्ली नंबर 6 मधील मुंबईचा सम्राट या गणपती बाप्पाच्या मंडपांमध्ये पर्यावरण रक्षण करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा, पाणी बचत काळाची गरज, बेसुमार वृक्ष तोड थांबली पाहिजे. वातावरणातील समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तर तापमान कमी होणार आहे, नागरिकांनी कचरा इतरत्र फेकू नये, कुठेही थुंकू नये, कचराकुंडीचा वापर करावा, थुंकण्यासाठी डस्ट बीन वापरावे, स्वच्छतेला महत्त्व द्यावे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची रोगराई पसरणार नाही, हे पथनाट्यातून याआपल्या वेगवेगळ्या शैलीतून सादरीकरण केले. यावेळी गणपती दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांनी हे पथनाट्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
गणेशोत्सव साजरा मुळात समाजप्रबोधन करण्यासाठी केला जातो. त्यामुळे प्राचीन संस्कृती नवीन पिढीला माहिती होते. यात काही गणपती मंडळ पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणाची होणारी हानी पाणीबचत वृक्षतोड अशी देखावे सादर करुन येणाऱ्या गणेश भक्तांचे या देखावा कडे लक्ष आकर्षित करुन काहीतरी नागरिकांमध्ये बद्दल व्हावा, हीच अपेक्षा मंडळ करत असते.