ETV Bharat / state

गारगाई प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव अडकला आचारसंहितेत

मुंबईच्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी महापालिकेने पालघर येथील गारगाई नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४२६ हेक्टर जागेवरील ६१९ कुटुंबाचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्यात येणार आहे.

author img

By

Published : Sep 29, 2019, 11:47 PM IST

सदानंद परब, अध्यक्ष सुधार समिती

मुंबई - राज्याची राजधानी मुंबईच्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी महापालिकेने पालघर येथील गारगाई नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४२६ हेक्टर खासगी जमीन खरेदी केली जाणार आहे.

गारगाई प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आचारसंहितेत अडकला आहे

४२६ हेक्टर जागेवरील ६१९ कुटुंबाचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिका १४८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र, हा प्रस्ताव आचारसंहितेमध्ये अडकला आहे. विधानसभा निवडणुकीनंतरच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते, अशी माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.

हेही वाचा - 'संभाजी भिडे यांनी या वयात बालिश वक्तव्य करू नये'

सात धरणांमधून मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लिटर पाणी पुरावठा केला जातो. मात्र, हा पाणीपुरवठा कमी असल्याने महानगरपालिकेने गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर ६९ मीटर उंच व ९७२ मीटर लांबीचे धरण बांधले जाणार आहे. या धरणातून मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे.

हेही वाचा - गांधीजयंतीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीची घोषणा

गारगाई पाणी प्रकल्पात, वाडा तालुक्यातील ओगदे, खोडदे ही गावे पूर्णतः बाधित होणार आहेत. तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशतः बाधित होणार आहेत. गारगाई प्रकल्प तानसा वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारित क्षेत्रात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आणि वन मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

Intro:मुंबई - मुंबईमधील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी महापालिकेने पालघर येथील गारगाई नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४२६ हेक्टर खाजगी जमीन खरेदी केली जाणार आहे. या जागेवरील ६१९ कुटुंबाचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका १४८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र हा प्रस्ताव आचारसंहितेमध्ये अडकला असून निवडणुकीनंतरच त्याला आता मंजुरी मिळू शकते अशी माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब यांनी दिली. Body:मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लिटर पाणीपूरावठा सात धरणांमधून केला जातो. मात्र हा पाणीपुरवठा कमी असल्याने २०४० पर्यंतची मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी महापालिकेने गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात
ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर ६९ मिटर उंचीचे व ९७२ मिटर लांबीचे धरण बांधले जाणार आहे. या धरणातून मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे. मात्र त्यासाठी ४२६ हेक्टर खाजगी जागा खरेदी करावी लागणार आहे. या जागेवरील ६१९ कुटुंबाचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्यात येणार असून त्यासाठी १४८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

गारगाई पाणी प्रकल्पात, वाडा तालुक्यातील ओगदे, खोडदे ही गावे पूर्णतः बाधित होणार आहेत. तर तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशतः बाधित होणार आहेत. या प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्रापैकी नदीखालील ७३ हेक्टर जमीन वगळता ५९७ हेक्टर जमीन वनजमीन आहे.तर १७० हेक्टर जमीन खाजगी आहे.गारगाई प्रकल्प तानसा वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारित क्षेत्रात मोडत असल्याने त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी आवश्यक आहे. तसेच वन मंत्रालयाची परवानगीही घेणे गरजेचे आहे. या प्रकल्पात १८५ कुटुंबे पूर्णपणे तर ४३४ कुटुंबे अंशतः बाधित होणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. निवडणूक संपल्यावर या प्रस्तावाला मंजुरी दिली जाऊ शकते अशी माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब यांनी दिली.

सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब यांचा बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.