मुंबई - कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव (Corona Spread) कमी झाल्याने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये (Reopen Colleges) सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे मंत्री उदय सामंत यांनी पाठवला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली.
हेही वाचा - Mayor Kishori Pednekar on BJP : हत्तीच्या पिल्लाचे 'चंपा', माकडाच्या पिलाचे नाव 'चिवा' ठेवू - महापौर पेडणेकर
- महाविद्यालयं सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे-
राज्यामध्ये कोरोनाचा तसेच ओमायक्रॉच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग ऑनलाईन सुरू आहेत. मात्र, प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता महाविद्यालये आणि विद्यापीठे ऑफलाइन सुरू करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
- मंत्री उदय सामंत यांनी कोरोना स्तिथीचा घेतला आढावा -
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोना आणि ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाबाबत आज आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयं सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यास राज्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत उदय सामंत यांनी दिले आहेत.
हेही वाचा - Schools Reopen Mumbai :...म्हणून मुंबईतील शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार - सुरेश काकाणी