मुंबई - यावर्षी जागतिक हेमोफिलिया दिनाच्या दिवशी तज्ञांनी रोगाविषयी जागरूकता, लवकर निदान, रिकॉम्बिनेंट थेरपी, योग्य उपचार आणि रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रॉफिलॅक्सिसचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. कोविड-१९ या साथीच्या रोगामुळे सर्व देशभर असलेल्या हेमोफिलिया ग्रस्त रुग्णांवर फार मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. हे यापूर्वी कधीही झाले नव्हते. हेमोफिलिया हा एक दुर्मिळ रोग आहे. रक्त गोठण्यास कारण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रथिनांच्या अभावामुळे रूग्णांच्या शरीरात रक्त गोठत नाही.
रिसर्चगेटच्या मते, भारतात प्रति १० हजार व्यक्तिंमध्ये एकाला हा हेमोफिलियाचा रोग आढळतो. हेमोफिलिया-बी असलेल्या रुग्णांमध्ये प्रोफिलॅक्सिसचे (रोगप्रतिबंधक) चांगले फायदे आढळून आले आहेत. 'हेमोफिलिया-बी हे हिमोफिलियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. रक्तस्त्राव टाळण्यासाठी त्यांच्या रक्तात गोठण्याचा घटक पुरेसा ठेवण्यासाठी गंभीर रक्तस्त्रावाचा हिमोफिलिया-बी असलेल्या रूग्णांना प्रोफिलॅक्सिस (रोगप्रतिबंधन) नावाच्या उपचार पध्दतीची मदत होते. या उपचार पद्धतीमुळे सांध्यांचे नुकसान आणि रक्तस्त्राव होण्याचा धोका कमी होतो, अशी माहिती डॉ. एम. बी. अगरवाल यांनी दिली.
प्रोफेलॅक्सिस हेमोफिलियाच्या रुग्णांना कामामध्ये सक्रिय राहू देते. या गंभीर अनुवंशिक रोगाच्या मुलांसाठी या एका चांगल्या थेरपीची शिफारस केली जाते. प्रोफिलॅक्सिस हे प्रमाणित उपचार आहेत, जे हेमोफिलिया ग्रस्त व्यक्तींमध्ये संयुक्त रोग रोखू किंवा टाळू शकते. भारतात पीडब्ल्यूएचच्या 10 टक्केपेक्षा कमी लोकांना प्रोफेलेक्सिस (रोगप्रतिबंधक ) उपचार मिळत आहेत. हेमोफिलिया असलेल्या लोकांना निरोगी सांधे आणि कमी रक्तस्त्रावासाठी प्रोफेलॅक्सिस उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे, असे डॉ. अगरवाल म्हणाले.