मुंबई - आज विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन पार पडले. यामध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी २८२ आमदारांना शपथ दिली. सकाळी ८ वाजतापासून हा शपथविधी सोहळा सुरू झाला होता. त्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचे स्वागत केले. तसेच यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची गळाभेट देखील घेतील.
विधानभवनातील घडामोडी -
- स. १२.११ - योग्य वेळी बोलणार, असे सांगून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा का दिला? यावर बोलण्याचे टाळले.
- स. ११.२१ - २८२ आमदारांचा शपथविधी सोहळा पूर्ण, राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता
- स. १०.५६ - रोहित पवार, राजेश पाडवी, संजय बनसोडे, राजू पारवे यांनी घेतली शपथ
- स. १०.४३ - मनोहर चंद्रिकापुरे, संजय जगताप, चंद्रकांत जाधव, किशोर जोरगेवार यांनी शपथ घेतली.
- स.१०.३० - आशुतोष काळे, सुनिल कांबळे, संग्राम जगताप, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, हिरामन खोसकर यांनी शपथ घेतली
- स. १०.२३ - रत्नाकर गुट्टे, नितेश राणे, तुषार राठोड, प्रकाश सुर्वे, प्रताप अडसड, योगेश कदम, राहुल अहेर यांनी घेतली शपथ
- स. १०.०६ - आकाश फुंडकर, दिलीप बनकर, सुरेश भोळे, बंटी भांगडीया, मोहन मते, समीर मेघे यांनी घेतली शपथ
- स. ९.५५ - अशोक पवार, लक्ष्मण पवार, किशोर पाटील, कुणाल पाटील, शाहजी पाटील, महेश चौगुले, सुनिल प्रभू यांनी घेतली शपथ
- स. ९.४९ - समीर कुणावार, दादाराव केचे, संजय केळकर, कृष्णा गजभे, प्रदीप जयस्वाल, शिरीष चौधरी, डॉ. संदीप धुर्वे, सुभाष धोटे यांनी घेतली शपथ
- स. ९.४४ - दिल्लीने महाराष्ट्रातील सत्ता बळकावण्यासाठी केलेले अघोरी प्रयत्न महाराष्ट्राने परतवून लावले - संजय राऊत
- स. ९.३९ - दिलीप मोहिते, रावसाहेब अनंतपूरकर, विश्वजीत कदम, आदित्य ठाकरे यांनी घेतली शपथ
- स. ९.३१ - उपमुख्यमंत्री कोण होणार? हे अद्यापही ठरले नाही - बाळासाहेब थोरात
-
#Maharashtra Congress President Balasaheb Thorat in #Mumbai: No decision has been taken on who will be deputy CM. pic.twitter.com/G2BKMxKr0p
— ANI (@ANI) November 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Maharashtra Congress President Balasaheb Thorat in #Mumbai: No decision has been taken on who will be deputy CM. pic.twitter.com/G2BKMxKr0p
— ANI (@ANI) November 27, 2019#Maharashtra Congress President Balasaheb Thorat in #Mumbai: No decision has been taken on who will be deputy CM. pic.twitter.com/G2BKMxKr0p
— ANI (@ANI) November 27, 2019
-
- स. ९.३० - विनोद अग्रवाल, अस्लम शेख, प्रताप सरनाईक, सदाशिव बनकर, धनंजय मुंडे यांनी घेतली शपथ
- स. ९.२९ - प्रशांत ठाकूर, संग्राम थोपटे, राजकुमार पटेल, संजय रायमुलकर, भारत भालके, रवी राणा, संजय शिरसाड यांनी घेतली शपथ
- स. ९.२१ - उद्धव ठाकरे राजभवनावर दाखल.
- स. ९.१७ - गोगावले, जयकुमार गोरे, कैलास गोरंट्याल, दीपक चव्हाण, मकरंद जाधव, अमित झणक, नहरही झिरवाड यांनी घेतली शपथ
- स. ९.१३ - शिवेंद्रसिंह भोसले, अनिल बाबर, अबू आझमी, डॉ. बालाजी केणीकर, गोवर्धन शर्मा यांनी घेतली शपथ
- स. ९.०७ - बच्चू कडू, किसन कथोरे, माणिकराव कोकाटे, आशिष जयस्वाल, दौलत दरोडा, नाना पटोले यांनी घेतली शपथ
- स. ९.०३ - विजय देशमुख, नमित मुंधडा, लता सोनवणे, आमदार सुरेश, के. सी. पाडवी, बबनराव शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी घेतली शपथ
- स. ९.००- गिता जैन, अदिती तटकरे, मुक्ता टीळक, प्रतिभा धानोरकर, मेघना साकोरे बोर्डीकर, श्वेता महाल्ले यांनी घेतली शपथ
- स. ८.५८ -सरोज अहिरे, मंजुळा गावित, यामिनी जाधव, सिमा हिरे यांनी घेतली शपथ
- स. ८.५५ - मंदा म्हात्रे, मोनिका रजाळे, डॉ. भारती लव्हेकर यांनी घेतली शपथ
- स. ८.५१ - विनय कोरे, मनिषा चौधरी, सुमन पाटील, देवयानी फरांदे यांनी घेतली शपथ
- स. ८.४८ - अतुल सावे, यशोमती ठाकूर, माधुरी मिसाळ, प्रणिती शिंदे यांनी घेतली शपथ
- स. ८.४५ - योगेश सागर, राणा जगतसिंह पाटील, विद्या ठाकूर यांनी घेतली आमदार पदाची शपथ
- स. ८.४३ - अमित देशमुख, प्रकाश भारसाखळे, दीपक केसरकर, संजय कुटे, रविंद्र वायकर, रविंद्र चव्हाण यांनी घेतली शपथ
- स. ८.३९ - दादाजी भुसे, संजय राठोड, गुलाब पाटील, मदन येरावार, रवि पाटील, संजय सावकारे यांनी घेतली शपथ
- ८.३५ - रणजित कांबळ, धर्मराव बाबा आत्राम, विजय वडेट्टीवार, प्रकाश सोळंकी, उदय सामंत, तानाजी मुटकुळे यांनी घेतली शपथ
- ८.३१ - चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, सुनिल केदार यांचा शपथविधी
- ८.३० - गणपत गायकवाड, सुभाष देशमुख, आशिष शेलार यांचा शपथविधी पार पडला
- ८.२७ - अब्दुल सत्तार, गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतली शपथ
- स.८.२४ - एकनाथ शिंदे, जयकुमार रावल, सुरेश खाडे यांनी शपथ घेतली
- स. ८.२२ - विखे पाटील, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, बबन लोणीकर यांनी शपथ घेतली.
- स. ८.१९ - हसन मुश्रीफ, भास्कर जाधव, पृथ्वीराज चव्हाण यांनी शपथ घेतली
- स. ८.१७ - अनिल देशमुख, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंदे यांनी घेतली शपथ
- स. ८.१५ - गणेश रामचंद्र नाईक, प्रकाश कल्लप्पा आव्हाडे आणि नवाब मलिक यांनी घेतली शपथ
- स. ८.१४ - बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी घेतली शपथ
- स. ८.१३ - अजित पवारांनी घेतली आमदार पदाची शपथ
- स.८.०९ - दिलीप वळसे पाटील आणि हरिभाऊ बागडे यांनी शपथ घेतली.
- स.८.०८ - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली.
- स. ८.०७ - डॉ. विजय गावित यांनी घेतली विधानसभा सदस्य पदाची शपथ
- स. ८.०५ - श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते सर्वप्रथम विधानसभा सदस्य पदाची शपथ
- स.८.०२ - विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
- स. ७.५५ - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
- स. ७.५० - राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार विधानभवनात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांची गळाभेट घेतली.
- स. ७.३२ - राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील विधानभवनात दाखल... आमदार पदाची शपथ घेण्यासाठी उत्सुक असल्याचे ते म्हणाले.
- स. ७.३० - सुप्रिया सुळे आमदारांचे स्वागत करण्यासाठी विधानभवनात पोहोचल्या आहेत, तर 'आगे-आगे देखो होता हैं क्या' असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्यासोबत दिलीप वळसे-पाटील देखील होते.
- स. ७.२६ - आमदार सुनील केदार यांचे विधीमंडळात आगमन
- स. ७.१९ - हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांचे आगमन
- स. ७.१८ - विधीमंडळ आवारात सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचे आगमन
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच शेवटी सुटला आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येण्याचे निश्चित झाले आहे. मंगळवारी तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. आता गुरुवारी उद्धव ठाकरे शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष सर्व आमदारांना शपथ देणार आहेत.