मुंबई - परळ टर्मिनसवर सजलेल्या पहिल्या लोकलला आज रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ती लोकल कल्याणच्या दिशेला रवाना झाली. गेल्या अनेक वर्षांपासून परळ टर्मिनसची प्रवाशांमधून मागणी होती, ती अखेर आज पूर्ण झाली.
परळहून १६ अप लोकल आणि १६ डाऊन अशा एकूण ३२ लोकल फेऱ्या होणार आहेत. यामुळे दादर स्थानकातील प्रवासी भार कमी होणार आहे. या टर्मिनसवर प्रवाशांसाठी सरकते जिने बसवण्यात आले आहेत.
नव्या परळ टर्मिनसमध्ये आहेत या सुविधा -
- डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्मसह नवीन टर्मिनस लाईन
- दोन्ही प्लॅटफॉर्मवर फ्लोरिंग आणि कव्हर ओव्हर शेड
- पूर्व पश्चिमेला जोडणारा १२ मीटर रुंद पादचारी पूल
- नवीन आयलेंड प्लॅटफॉर्म आणि जुना प्लॅटफॉर्मवर सरकते जिने व लिफ्ट
- उपनगरीय गाड्यांसाठी परळ आणि दादर दरम्यान दोन स्टॅब्लिनग लाईन