ETV Bharat / state

कितीही प्रयत्न केला तरी भाजपचे सरकार येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबत भाजप, शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरू असतानाच महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांची सकाळी भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर चव्हाण माध्यमांशी बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Nov 8, 2019, 9:15 PM IST

मुंबई - अस्थिर परिस्थिती आज संपुष्टात आली आहे. भारतीय जनता पक्ष सरकार बनवू शकणार नाही, हे आज त्यांनी मान्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांना बहुमत मिळाले नाही. जनेतेने त्यांना नाकारले आहे. दुष्काळ निवारणासाठी ठोस पाऊले उचलण्याऐवजी फडणवीस सरकारने बुलेट ट्रेन आणली, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबत भाजप, शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरू असतानाच महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांची सकाळी भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर चव्हाण माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस सरकारला जनतेन नाकारले आहे. त्यांना शेतकऱ्यांकडे बघण्यासाठी वेळ नाही. मात्र, त्यांच्या मित्र पक्षांवर टीका करण्यासाठी वेळ आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी 15 दिवसापासून चिंतेत आहे. त्यांना सरकारने मदत केली नाही. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा आहे. आता पुन्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येणार नाही, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

Intro:Body:

prithviraj chavan

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.