ETV Bharat / state

टाळेबंदीमुळे पुरोहितांच्या कुटुंबाची बिघडली आर्थिक घडी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार धार्मिक कार्यक्रम व विधींवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ब्राह्मण समाजातील पुरोहिताचे काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 3, 2021, 5:21 PM IST

मुंबई - देशभरात कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने थैमान माजवले असताना यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई सह राज्यभरात कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. अशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी प्रशासनाकडून बंद करण्यात आलेले आहेत. टाळेबंदीचा दुसरा टप्पा पुन्हा लागू करण्यात आल्यामुळे मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात उत्तरकार्य, सत्यनारायण, लग्न, मुंज यांसारखे विधी करून आपले पोट भरणाऱ्या हजारो पुरोहितांवर सध्या उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे.

टाळेबंदीमुळे पुरोहितांच्या कुटुंबाची बिघडली आर्थिक घडी

मंदिर बंद अन् धार्मिक विधी बंद

संजय व्यवहारे गुरुजी हे गेली अनेक वर्षे पुरोहिताचे काम करून आपले व आपल्या कुटुंबियांचे पोट भरत आहेत. कोरोना संक्रमणामुळे पहिल्यांदा टाळेबंदी लावण्यात आल्यानंतर त्यांच्या आर्थिक मिळकतीवर याचा मोठा परिणाम झाला होता. मात्र, त्यानंतर टाळेबंदीत सूट देण्यात आल्यामुळे त्यांची आर्थिक घडी सुरळीत चालत असताना आता पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे मंदिर व मोठी धार्मिक कार्य बंद करण्यात आल्याने याचा फटका त्यांना बसला आहे. यामुळे सध्या आर्थिक समस्यांना हजारो पुरोहितांना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी म्हटलेल आहे. राज्य सरकारकडून कडक निर्बंध घोषित करत असताना समाजातील वेगवेगळ्या घटकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, लग्न, मुंज, सत्यनारायणाची पूजा, उत्तरकार्य किंवा इतर धार्मिक विधी करून आपले व आपल्या कुटुंबीयांचं पोट भरणाऱ्या पुरोहितांना सध्याच्या काळामध्ये घर कसे चालवायचे हा प्रश्न सतावत असल्याचे संजय व्यवहारे गुरुजी यांनी म्हटलेले आहे.

राज्य सरकारने द्यावी सूट

निर्झर बर्वे हे गेली दहा वर्षे भिक्षूकीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. मुळात व्यवसाय करणारे निर्झर बर्वे भिक्षुकी करून त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक घडी आजपर्यंत बसवत आलेले होते. मात्र, टाळेबंदीमुळे कुठेही धार्मिक विधींची कामे मिळत नसल्यामुळे सध्या महिन्याचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांना पडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारकडून ब्राह्मण समाजातील पुरोहिताचे काम करणाऱ्या नागरिकांसाठी काही ना काही मदत किंवा सूट देण्यात यावी, असे निर्झर बर्वे यांनी म्हटलेले आहे.

हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरण : अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.