ETV Bharat / state

प्रवीण परदेशी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार सोमवारी स्वीकारणार

या ४ वर्षाच्या कार्यकाळात मेहता यांनी नव्याने विकास आराखडा बनवून पालिकेत आणि राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला. याच कार्यकाळात मेहता यांनी पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर अंकुश निर्माण केला.

प्रवीण परदेशी
author img

By

Published : May 10, 2019, 11:06 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची बदली मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी असलेल्या प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी १३ मे ला आपला पदभार स्वीकारणार आहेत. अजोय मेहता यांनी मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडून तर प्रवीण परदेशी यांनी अजोय मेहता यांच्याकडून पदभार स्वीकारावा असे पत्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.

मुंबईच्या २०१४ ते २०३४ च्या विकास आराखड्यात चुका असल्याने नव्याने विकास आराखडा बनवण्याची जबाबादारी देत अजोय मेहता यांची ४ वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. या ४ वर्षाच्या कार्यकाळात मेहता यांनी नव्याने विकास आराखडा बनवून पालिकेत आणि राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला. याच कार्यकाळात मेहता यांनी पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर अंकुश निर्माण केला. याचे बक्षीस म्हणून मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली झाल्यावर त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाआधी वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. १९९३ मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा झाली होती. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते. फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून परदेशी यांची ओळख निर्माण झाली आहे.

Intro:मुंबई -
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची बदली मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील अधिकारी असलेल्या प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवारी 13 मे ला आपला पदभार स्वीकारणार आहेत. अजोय मेहता यांनी मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडून तर प्रवीण परदेशी यांनी अजोय मेहता यांच्याकडून पदभार स्वीकारावा असे पत्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. Body:मुंबईच्या 2014 ते 2034 च्या विकास आराखड्यात चुका असल्याने नव्याने विकास आराखडा बनवण्याची जबाबादारी देत अजोय मेहता यांची चार वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. या चार वर्षाच्या कार्यकाळात मेहता यांनी नव्याने विकास आराखडा बनवून पालिकेत आणि राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला. याच कार्यकाळात मेहता यांनी पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर अंकुश निर्माण केला. याचे बक्षिस म्हणून मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली झाल्यावर त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी हे १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाआधी वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. १९९३ मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा झाली होती. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते. फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून परदेशी यांची ओळख निर्माण झाली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.