ETV Bharat / state

बाळासाहेब ठाकरे योजनाही सरकारला राबवता आली नाही; दरेकरांची सरकारवर टीका - Balasaheb Thackeray project Pravin Darekar

शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व दलालांचे उच्चाटन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची घोषणा सरकारने केली होती. मात्र, ही योजना देखील सरकारला राबवता आली नाही, अशी खरमखरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी आघाडी सरकारवर केली.

Pravin Darekar on Balasaheb Thackeray project
प्रविण दरेकर टीका महाआघाडी सरकार
author img

By

Published : Mar 2, 2021, 10:22 PM IST

मुंबई - शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व दलालांचे उच्चाटन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची घोषणा सरकारने केली होती. मात्र, ही योजना देखील सरकारला राबवता आली नाही, अशी खरमखरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी आघाडी सरकारवर केली. विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.

हेही वाचा - राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी; कोरोनाचा धोका

उलट गौरव करायला हवा होता

महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही वैयक्तिक टीका केली जाते. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेत्यांना शरीरयष्टीवरून चिडवले जाते. ही सभागृहाची संस्कृती नाही. सत्ताधाऱ्यांनी या संविधानिक पदाची गरीमा घालवली. परंतु, एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना आपण जनतेसाठी काय दिवे लावले, याचाही विचार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा, अशा शब्दांत दरेकर यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. तसेच, राज्यपालांनी अस्खलित मराठी भाषेतून भाषण केल्याने त्यांचा गौरव करायला हवा होता, असे सांगत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले.

जगाला दिशा देण्याचे काम मोदींचे

कोरोनामुळे महाराष्ट्रात ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला. सरकार याबाबत चिंता व्यक्त करण्याऐवजी केंद्राकडे बोट दाखवत आहे. ज्या डब्ल्यूएचओने धारावीचे अभिनंदन केले, त्या डब्ल्यूएचओला आणि जगाला दिशा देण्याचे काम मोदींनी केल्याची दरेकर यांनी पुष्टी जोडली. कोरोना काळात केंद्र सरकारने कोरोनासाठी सर्वच राज्यांना मदत केली. महाराष्ट्रालाही केली, मात्र त्याचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात केला नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

योजना अंमलबजावणी अभावी फोल

महाविकास आघाडी सरकारने राज्यात अनेक योजना आणल्या. विकेल ते पिकेल अभियानात १ हजार ३४५ मुल्य साखळी विकासाचे प्रकल्पाचे नियोजन केले. आजपर्यंत त्यांना मनुष्यबळसुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे, या योजनेची सरकारला ५ टक्केसुद्धा अंमलबजावणी करता आलेली नाही. सरकारची अवस्था देखील अशीच असल्याने त्यांची अनेक निर्णये, योजना अंमलबजावणी अभावी फोल ठरल्या आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला.

राज्यपाल अभिभाषणावरून गदारोळ

विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर बोलत असताना संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी, खालच्या सभागृहात अशाच प्रकारे भाषण ऐकले. मात्र, इथे फक्त त्यातील काही कागद गायब झाल्याचे दिसतात, असा टोला मारला. यावर दरेकर यांनी आक्षेप घेत, विरोधी पक्षनेत्यांनी काय बोलावे, काय बोलू नये, हे तुम्ही सांगू नका, असे सुनावले. विरोधी बाकांवरील सदस्य या मुद्द्यावरून वेलमध्ये उतरले व त्यांनी परब यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. यामुळे गदारोळ झाल्याने परिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

विरोधकांचा बहिष्कार

सभागृह सुरू झाल्यानंतरही, कोणाचा अवमान करण्याचा उद्देश नव्हता. विरोधी पक्षनेत्यांची लिंक सारखी तुटत होती, म्हणून सांगितले, असे परब म्हणाले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिल परब यांनी माफी मागे पर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली. भाजप व मित्रपक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.

हेही वाचा - राज्यात नव्या 7 हजार 863 नव्या रुग्णांची नोंद .तर 54 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.