ETV Bharat / state

मुंबईत पावसाचे नव्हे तर महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी - प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकर मुंबई न्यूज

शनिवारची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात दुर्घटना घडल्या आहेत. एकूण दुर्घटनेत जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, हे पावसाचे नव्हे महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी आहेत, असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केला आहे .

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Jul 18, 2021, 5:11 PM IST

Updated : Jul 18, 2021, 10:56 PM IST

मुंबई - मुंबईत शनिवारी (17 जुलै) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात दुर्घटना घडल्या आहेत. विक्रोळी सुर्यनगर येथे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एकावरती उपचार सुरू आहे. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे पावसाचे नव्हे, तर महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते विक्रोळीतील सूर्या नगर येथील घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

'पालिकेने जबाबदारी स्वीकारावी'

'हे पूर्णपणे महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी आहेत. मुंबईत पाऊस दरवर्षी पडतो. दरवर्षी मुंबईही तुंबते. अशावेळी तुंबणारी ठिकाणे कोणती व कोणत्या भागात दरडी आहेत, याचा डाटा पालिकेकडे असतो. केवळ नोटीस चिटकवली म्हणजे जबाबदारी संपली का? जर त्यांनी त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न सोडवला असता तर ते स्थलांतर झाले असते. आता नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर आम्ही नोटिसा दिल्या होत्या म्हणजे यांची जबाबदारी संपली का. पावसावर जबाबदारी ढकलली, असे होत नाही. तुम्हाला जबाबदारीपासून पळता येणार नाही. या सर्व झालेल्या घटनेला महानगरपालिका जबाबदार आहे आणि त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी. पाच-दहा लाख रुपये देऊन लोकांचे जीव तर परत येणार नाहीत ना. यामुळे संभाव्य दुर्घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे', असे दरेकरांनी म्हटले आहे.

एकूण 30 जणांचा मृत्यू

मुंबईत 11 ठिकाणी घरे आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यात वाशी नका येथे 24 जणांना बाहेर काढले. त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जखमी झाले आहेत. विक्रोळीतील सुर्या नगर येथे 11 जणांना बाहेर काढले आहे. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 जण जखमी झाला आहे. अशा एकूण 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुलुंडमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

आज पहाटे 4:55 वाजता पोलीस नियंत्रण कक्षातील प्राप्त माहितीनुसार भांडूप (प) येथील कोंबड गल्ली येथील अमरकुल विद्यालयाजवळ असलेल्या चाळीतील घराच्या भिंतीचा भाग पडला. त्यात सोहम महादेव थोरात (16 वर्षे) हा मुलगा जखमी झाला. त्याला उपचारासाठी मुलुंडच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोहम थोरातचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने घोषीत केले.

येथे साचले पाणी

शहर - १) हिंदमाता २) सायन रोड न. २४ ३) गांधी मार्केट ४) वडाळा चर्च ५) सक्कर पंचायत चौक ६) नायर रुग्णालय ७) संगमनगर वडाळा ८) मडकेबुवा चौक

पूर्व उपनगर - १) शितल सिनेमा २) शेल कॉलनी ३) आरसीएफ कॉलनी ४) अंजनाबाई नगर ५) अणुशक्ती नगर ६) कुर्ला आगार ७) शेरे पंचाब कॉलनी ८) मानखुर्द रेल्वे स्थानक ९) नेहरु नगर १०) स्वस्तिक चेंबर्स ११) कल्पना सिनेमा १२) टेंबी ब्रीज

पश्चिम उपनगर : १) नॅशनल कॉलेज , बांद्रा (प) २) साईनाथ सबवे ३) मिलन सबवे ४) अंधेरी सबवे ५) अंधेरी मार्केट ६) दहिसर सबवे ७) बांद्रा टॉकीज ८) वीरा देसाई रोड अंधेरी (प) ९) वाकोला ब्रीज १०) बेस्ट नगर, गोरेगांव

हेही वाचा - देवेंद्र फडवणीसांची वागणूक बघता ते 'नैराश्यात' गेल्यासारखे वाटतात - यशोमती ठाकूर

Last Updated : Jul 18, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.