ETV Bharat / state

MPSC Resealt : MPSC अभियांत्रिकी परीक्षेत SC मधून प्रतीक आगवणे तर, मुलींमधून अक्षता मांजरे राज्यात प्रथम - प्रतीक प्रतिसाद आगवणे

महाराष्ट्र राज्याचा लोकसेवा आयोगातर्फे तांत्रिकी अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. 2021 या कालावधीत होणाऱ्या परीक्षा मे 2022 मध्ये घेतल्या गेल्या होत्या. तो निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये राज्यात अनुसूचित जातीच्या प्रवर्गामधून प्रतीक प्रतिसाद आगवणे हा प्रथम तर महिलांमधून अक्षता दत्तात्रय मांजरे यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.

MPSC Resealt
MPSC Resealt
author img

By

Published : Jun 15, 2023, 10:29 PM IST

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील निकाल आज जो जाहीर केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुली आणि मुलं उमेदवारांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. राज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रतीक प्रतिसाद आगवणे हा प्रथम आला तर महिलांमधून अक्षता दत्तात्रय मांजरे हिनेदेखील पहिला क्रमांक पटकावलेला आहे. या संदर्भात छात्रभरती विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रोहित ढाले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की "अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय आणि महिला यांना जर उच्च शिक्षणाची संधी मिळाली तर त्या संधीचे सोने कसे करतात याचा उदाहरण म्हणून हा निकाल पाहता येईल."

405 पदांकरिता उमेदवारांची शिफारस : महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 405 पदांकरिता अनेक उमेदवारांची शिफारस केलेली आहे. पण त्यातून जे प्रथम आलेले आहेत. त्या संदर्भातील नावे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेले आहेत. संपूर्ण निकाल हा त्यांच्या संकेतस्थळावर देखील त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. निकाल जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यांना तो पाहता येईल.

"अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय आणि महिला यांना जर उच्च शिक्षणाची संधी मिळाली तर त्या संधीचे सोने कसे करतात याचा उदाहरण म्हणून हा निकाल पाहता येईल."- रोहित ढाले, अध्यक्ष छात्रभरती विद्यार्थी संघटना

राज्यामध्ये एमपीएससीच्या या परीक्षेमध्ये सर्वसाधारण गटांमधून सोनाली अर्जुनराव म्हात्रे ही महिलांमधून प्रथम आली. तर मागासवर्ग म्हणजे इतर मागासवर्ग या गटातून विशाल महादेव यादव हा राज्यात प्रथम आलेला आहे. तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून प्रमोद बाळासाहेब चौगुले हा या परीक्षेमध्ये प्रथम आलेला आहे.

पडताळणी करता अर्ज करणे आवश्यक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा जो निकाल जाहीर केलेला आहे. त्यामध्ये ज्यांची शिफारस केलेले नाही. त्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उत्तरपत्रिका दिल्या जातील. त्यातील गुणांची पडताळणी करता येईल. जर त्या उमेदवारांना पडताळणी करायची असेल, तर त्याबद्दलचे मार्कशीट म्हणजे गुणपत्रके त्यांच्या वेबसाईटवरील प्रोफाइलमध्ये जाऊन ते त्यांना पाहता येतील. मात्र, निकाल निकाल लागल्याच्या तारखेपासून दहा दिवसात त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.